Lokmat Money > बिझनेस न्यूज > जगाला ९२ अब्जाधीश देणारं भारतातील हे शहर पुन्हा बनलं टॉपर, चीनच्या बीजिंगलाही टाकलं मागे

जगाला ९२ अब्जाधीश देणारं भारतातील हे शहर पुन्हा बनलं टॉपर, चीनच्या बीजिंगलाही टाकलं मागे

न्यूयॉर्क हे ११९ अब्जाधीश असलेलं शहर आहे. तर ९२ अब्जाधीशांसह लंडन दुसऱ्या स्थानावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 12:43 PM2024-03-26T12:43:01+5:302024-03-26T12:44:16+5:30

न्यूयॉर्क हे ११९ अब्जाधीश असलेलं शहर आहे. तर ९२ अब्जाधीशांसह लंडन दुसऱ्या स्थानावर आहे.

This city in India mumbai gives 92 billionaires to the world became the topper again leaving even China s Beijing behind | जगाला ९२ अब्जाधीश देणारं भारतातील हे शहर पुन्हा बनलं टॉपर, चीनच्या बीजिंगलाही टाकलं मागे

जगाला ९२ अब्जाधीश देणारं भारतातील हे शहर पुन्हा बनलं टॉपर, चीनच्या बीजिंगलाही टाकलं मागे

मायानगरी मुंबईला सात वर्षांनंतर पुन्हा गमावलेला दर्जा मिळाला आहे. अब्जाधीशांचे शहर म्हणून मुंबई आता आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर आहे. तर अब्जाधीशांच्या बाबतीत न्यूयॉर्कनंतर मुंबई जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूयॉर्क हे ११९ अब्जाधीश असलेलं शहर आहे. तर ९२ अब्जाधीशांसह लंडन दुसऱ्या स्थानावर आहे.
 

ॲरॉनच्या यादीनुसार, मॅक्सिमम सिटीनं २६ नवीन अब्जाधीश जोडून चीनच्या राजकीय आणि सांस्कृतिक राजधानीला मागे टाकलंय. बीजिंगमध्ये एका वर्षात १८ अब्जाधीश आता कोट्यधीश झाले आहेत. म्हणजेच ते अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. आता बीजिंगमध्ये फक्त ९१ अब्जाधीश उरलेत आणि बीजिंग याबाबतीत जगात चौथ्या आणि आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर शांघाई ८७ अब्जाधीशांसह पाचव्या स्थानावर आहे.
 

मुंबईतील सर्व अब्जाधीशांची एकूण संपत्ती ४४५ अब्ज डॉलर आहे. हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 47 टक्क्यांनी अधिक आहे. तर बीजिंगच्या अब्जाधीशांची एकूण संपत्ती २६५ अब्ज डॉलर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २८ टक्क्यांनी कमी आहे. मुंबईत ऊर्जा आणि फार्मास्युटिकल्ससारख्या क्षेत्रातून पैशांचा पाऊस पडत आहे. 
 

कोण सर्वाधिक वेल्थ गेनर?
 

रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज मंगल प्रभात लोढा आणि कुटुंब हे टक्केवारीनुसार (११६%) मुंबईतील सर्वाधिक वेल्थ गेनर ठरले आहेत. जर आपण जगातील श्रीमंतांच्या यादीबद्दल बोललो तर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत चांगली वाढ झाली आहे आणि त्यांनी आपलं १० वं स्थान कायम ठेवलंय. याचं श्रेय प्रामुख्यानं रिलायन्स इंडस्ट्रीजला जातं.
 

त्याचप्रमाणे गौतम अदानी यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाल्यानं त्यांची जागतिक क्रमवारीत ८ स्थानांनी वाढ होऊन ते १५ व्या स्थानी पोहोचलेत. एचसीएलचे शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती आणि जागतिक क्रमवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. ते १६ स्थानांनी झेप घेत ३४ व्या स्थानी पोहोचलेत.

Web Title: This city in India mumbai gives 92 billionaires to the world became the topper again leaving even China s Beijing behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.