Lokmat Money > बिझनेस न्यूज >  TVS ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे सर्वात खास, १४५ किमीची रेंज, ८२ किमी टॉप स्पिड, किंमत केवळ....

 TVS ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे सर्वात खास, १४५ किमीची रेंज, ८२ किमी टॉप स्पिड, किंमत केवळ....

TVS iQube : भारतीय टू व्हिलर निर्माता कंपनी TVS ने देशामध्ये एक नवी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube चं नवं रूप आहे. तिला TVS iQube ST असं नाव देण्यात आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 01:20 PM2023-01-15T13:20:51+5:302023-01-15T13:22:27+5:30

TVS iQube : भारतीय टू व्हिलर निर्माता कंपनी TVS ने देशामध्ये एक नवी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube चं नवं रूप आहे. तिला TVS iQube ST असं नाव देण्यात आलं आहे.

This electric scooter from TVS is the most exclusive, 145 km range, 82 km top speed, price only.... |  TVS ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे सर्वात खास, १४५ किमीची रेंज, ८२ किमी टॉप स्पिड, किंमत केवळ....

 TVS ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे सर्वात खास, १४५ किमीची रेंज, ८२ किमी टॉप स्पिड, किंमत केवळ....

भारतीय टू व्हिलर निर्माता कंपनी TVS ने देशामध्ये एक नवी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube चं नवं रूप आहे. तिला TVS iQube ST असं नाव देण्यात आलं आहे. स्कूटरचे दोन व्हर्जन स्टँडर्ड आणि S ची विक्री आधीपासूनच बाजारामध्ये करण्यात येत आहे.  या स्कूटरच्या नव्या व्हर्जनमध्ये सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक फिचर्ससुद्धा पाहायला मिळतात. या स्कूटरची स्पर्धा ही भारतीय बाजारामध्ये हीरो इलेक्ट्रिक, विडा आणि ओला यासारख्या कंपन्यांच्या स्कूटरसोबत आहे.

iQube इलेक्ट्रिक स्कूटर पाहण्यामध्ये खूप जबरदस्त आहे. ते भारतीय बाजारामध्ये मिळणाऱ्या काही सर्वात चांगल्या इलेक्ट्रिक टू-व्हिलरपैकी एक आहे. जर तुम्हीसुद्धा दैनंदिन वापरासाठी टू-व्हीलर खरेदी करू इच्छित असाल तर ही स्कूटर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. आता कंपनीने ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये iQube ST ला शोकेस केले आहे. लुक्सच्या बाबतीत  ST आणि S ट्रिम्सच्यामध्ये खूप फरक नाही आहे. ST ला इतर दोन व्हेरिएंटच्या तुलनेत काही वेगळे रंग आणि स्कूटरवर ST बॅजिंग मिळते. 

]इतर व्हेरिएंटच्या तुलनेमध्ये iQube ST ची बॅटरी पॅक सर्वात मोठी आहे. इतर दोन व्हेरिएंटच्या ३.०४kWh च्या तुलनेत या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ४.५६kWh ची बॅटरी लावलेली आहे. IQube ST ची रायडिंग रेंज इको मोडमध्ये १४५ किमी आणि पॉवर मोडमध्ये ११० किमी आहे. त्याशिवाय बॅटरी पॅक ० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यासाठी ४ तास ६ मिनिटांचा वेळ लागतो. जर फास्ट चार्जरचा उपयोग केला तर बॅटरी पॅकला ० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यास केवळ २ तास ३० मिनिटे वेळ लागतो. 

Web Title: This electric scooter from TVS is the most exclusive, 145 km range, 82 km top speed, price only....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.