Join us

जबरदस्त! या भारतीय कंपनीकडे पैसाच पैसा; कंपनीचे बाजार भांडवल पाकच्या जीडीपीपेक्षाही जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 7:45 AM

देशातील प्रमुख उद्याेगसमूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाने माेठी झेप घेतली आहे. कंपनीचे बाजार भांडवल पाकच्या जीडीपीपेक्षाही पुढे गेले आहे.

नवी दिल्ली : देशातील प्रमुख उद्याेगसमूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाने माेठी झेप घेतली आहे. कंपनीचे बाजार भांडवल पाकच्या जीडीपीपेक्षाही पुढे गेले आहे. कंपनीचे बाजार भांडवल ३६५ अब्ज डाॅलर म्हणे सुमारे ३० लाख कोटींवर पाेहाेचले आहे. तर, दिवाळखाेरीच्या उंबरठ्यावर आलेल्या पाकिस्तानचा जीडीपी ३४१ अब्ज डाॅलर म्हणजे सुमारे २८ लाख काेटी एवढा आहे. बाजार तेजीत असल्याने अनेक उद्याेग समूहांचे भांडवली मूल्य  वाढले आहे.

१४.९३ लाख काेटी रुपये

एवढे बाजार भांडवल टाटा समूहातील टीसीएस या एकाच कंपनीचे आहे. हा पाकिस्तानच्या जीडीपीच्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. २५ कंपन्या टाटा समूहाच्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत.

बाजार भांडवल म्हणजे कंपनीच्या शेअरहाेल्डर्सकडे असलेल्या एकूण शेअरचे मूल्य. बाजार भांडवली मूल्याच्या आधारे कंपन्यांचे वर्गीकरण केले जाते. त्यानुसार गुंतवणूकदारांना शेअरची निवड आणि खरेदी करणे साेपे जाते.

भारतातील टाॅप १० कंपन्या

टाटा समूह- ३०.००

रिलायन्स समूह- २१.००

एचडीएफसी- १०.७८

आयसीआयसीआय- ७.१७

इन्फाेसिस- ७.०६

एसबीआय- ६.७३

एलआयसी- ६.५७

भारती एअरटेल- ६.३०

हिंदुस्तान युनिलीव्हर- ५.५८

आयटीसी- ५.०५

जगातील टाॅप ७ कंपन्या काेणत्या?

मायक्राेसाॅफ्ट         २४९ लाख काेटी रुपये

ॲपल          २३९ लाख काेटी रुपये

साैदी अरॅमकाे                १६३ लाख काेटी रुपये

गुगल          १५२ लाख काेटी रुपये

ॲमेझाॅन              १४८.५ लाख काेटी रुपये

एनव्हीडिया             १४८.१ लाख काेटी रुपये

फेसबुक (मेटा)          ९८.७ लाख काेटी रुपये

टॅग्स :टाटा