Join us

Aadhar Card New Rules: आधारची ‘ही’ माहिती अमान्य; १ ऑक्टोबरपासून नियम होणार लागू, केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 8:44 AM

Aadhar Card New Rules: केंद्र सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आयकर विवरण दाखल करताना, तसेच ‘पॅन’साठी अर्ज करताना यापुढे ‘आधार’ अर्जाचा नाेंदणी क्रमांक मान्य राहणार नाही. १ ऑक्टाेबरपासून हा नियम लागू  हाेईल. केंद्र सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयकर विवरण दाखल करताना किंवा पॅनसाठी अर्ज करताना आधार अर्जाचा नाेंदणी क्रमांक देण्याचा पर्याय हाेता. ही सुविधा २०१७ पासून हाेती. मात्र, आता तसे करता येणार नाही.

का घेतला निर्णय?

आधार अर्जाच्या नाेंदणी क्रमांकाद्वारे एकापेक्षा जास्त ‘पॅन’ निर्माण हाेऊ शकतात. अशाने पॅनचा गैरवापर हाेण्याची शक्यता आहे. 

आधार व आधार  नाेंदणी क्रमांकात फरक काय? 

आधार हा १२ आकडी क्रमांक आहे, तर आधार नाेंदणी क्रमांक हा १४ आकडी क्रमांक आहे. आधारचा अर्ज दाखल करताना ताे दिला जाताे. त्यात अर्जाची तारीख आणि वेळ नमूद केलेली असते.

 

टॅग्स :आधार कार्ड