Digikore Studios IPO: डिजिकोर स्टुडियोज लिमिटेडच्या आयपीओनं (IPO) शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली. हा आयपीओ बुधवारी एनएसईवर (NSE) 57 टक्क्यांच्या प्रीमियमसह 270 रुपयांवर लिस्ट झाला. त्याच वेळी, सुरुवातीच्या व्यवहारादरम्यानच, शेअरला अपर सर्किटला लागलं आणि किंमत 283.50 रुपयांवर पोहोचली.
कंपनीने आयपीओसाठी 168-171 रुपये प्रति शेअर इश्यू किंमत निश्चित केली होती. त्याच वेळी, एका लॉटमध्ये 800 शेअर्स ठेवण्यात आले होते. याचा अर्थ असा की ज्या गुंतवणूकदारांनी कमीत कमी एका लॉटसाठी अर्ज केला असेल त्यांना 1,36,800 रुपये गुंतवावे लागले असते.
281 पट सबस्क्राईब
25 ते 27 सप्टेंबर दरम्यान सुरू झालेल्या या IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांच्या कालावधीत आयपीओ 281.58 पट सबस्क्राइब झाला. त्याचवेळी ग्रे मार्केटमध्येही नफ्याचं संकेत मिळत होते.
डिजिकोर स्टुडिओ लिमिटेड त्यांच्या 30.48 कोटी IPO मधून उभ्या केलेल्या रकमेसह त्यांच्या वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करेल. त्याच वेळी, हा पैसा सामान्य कॉर्पोरेट आणि ऑफर-संबंधित खर्चासाठी देखील वापरला जाईल. सारथी कॅपिटल अॅडव्हायझर्सची आयपीओसाठी बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि बिगशेअर सर्व्हिसेस हे अधिकृत रजिस्ट्रार होते.
काय करते कंपनी
डिजिकोअर स्टुडिओज लिमिटेड हा एक व्हिज्युअल इफेक्ट्स स्टुडिओ आहे. कंपनी चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही सीरिअल्स, डॉक्युमेंट्री आणि जाहिरातींसाठी व्हिज्युअल इफेक्ट (VFX) सेवा पुरवते. डिजिकोर हा भारतातील काही स्टुडिओपैकी एक आहे ज्याचं टीपीएन सारख्या नामांकित संस्थांद्वारे ऑडिट केले गेलं आहे. ही व्हीएफएक्स कंपनी Disney/Marvel, Netflix, Amazon, Apple, Paramount, Warner Bros. आणि Lions Gate सारख्या कंपन्यांच्या प्रोजेक्ट्सशी देखील जोडलेली आहे.
(टीप - यात शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)