शेअर बाजारातील स्मॉलकॅप रिअल इस्टेट कंपनी असलेल्या गणेश हाउसिंग कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ दिसू आली आहे. गणेश हाऊसिंगचा शेअर शुक्रवारी १५% हून अधिकनेत वधारून ९७५.१० रुपयांवर पोहोचला. महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या शअरने, शुक्रवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. गणेश हाऊसिंगचा शेअर गुरुवारी ८३१.९५ रुपयांवर बंद झाला होता. हा शेअर गेल्या ६ महिन्यांत १४५% ने वधारला आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक ३४३.२० रुपये एवढा आहे.
१ लाखाचे झाले ४७ लाख रुपये -
गणेश हाउसिंग कॉर्पोरेशनचा शेअर गेल्या ४ वर्षांत ४५००% हूनही अधिकने वधारला. गेल्या २९ मे २०२० रोजी कंपनीचा शेअर २०.५० रुपयांवर होता. जो ७ जून २०२४ रोजी ९७५.१० रुपयांवर पोहोचला. जर एखाद्या व्यक्तीने २९ मे २०२० रोजी गणेश हाउसिंगच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता तिचे मूल्य ४७.५४ लाख रुपये एवढे झाले असते.
एक वर्षात १७०% चा परतावा -
गणेश हाउसिंग कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात १७०% ची वृद्धी झाली आहे. ७ जून २०२३ रोजी कंपनीचा शेअर ३६१.१० रुपयांवर होता. जे ७ जून २०२४ रोजी ९७५.१० रुपयांवर पोहोचला. गेल्या ६ महिन्यांत कंपनीचा शेअर १४५% नी वधारला आहे. हा शेअर ७ डिसेंबर २०२३ रोजी ३९४ रुपयांवर होता. जो ७ जून २०२४ रोजी ९७५.१० रुपयांवर पोहोचला आहे.
मार्च २०२४ तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीमध्ये प्रमोटर्सचा वाटा ७३.०६ टक्के एवढा आहे. तर पब्लिक शेअरहोल्डिंग २६.९४ टक्के एढी आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)