Join us

याला म्हणतात 'खटा-खट खटा-खट रिटर्न'! 4 वर्षांत ₹1 लाखाचे झाले ₹47 लाख; दिला 4500% चा बंपर परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 4:37 PM

महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या शअरने, शुक्रवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे.

शेअर बाजारातील स्मॉलकॅप रिअल इस्टेट कंपनी असलेल्या गणेश हाउसिंग कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ दिसू आली आहे. गणेश हाऊसिंगचा शेअर शुक्रवारी १५% हून अधिकनेत वधारून ९७५.१० रुपयांवर पोहोचला. महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या शअरने, शुक्रवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. गणेश हाऊसिंगचा शेअर गुरुवारी ८३१.९५ रुपयांवर बंद झाला होता. हा शेअर गेल्या ६ महिन्यांत १४५% ने वधारला आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक ३४३.२० रुपये एवढा आहे.

१ लाखाचे झाले ४७ लाख रुपये - गणेश हाउसिंग कॉर्पोरेशनचा शेअर गेल्या ४ वर्षांत ४५००% हूनही अधिकने वधारला. गेल्या २९ मे २०२० रोजी कंपनीचा शेअर २०.५० रुपयांवर होता. जो ७ जून २०२४ रोजी ९७५.१० रुपयांवर पोहोचला. जर एखाद्या व्यक्तीने २९ मे २०२० रोजी गणेश हाउसिंगच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता तिचे मूल्य ४७.५४ लाख रुपये एवढे झाले असते.

एक वर्षात १७०% चा परतावा - गणेश हाउसिंग कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात १७०% ची वृद्धी झाली आहे. ७ जून २०२३ रोजी कंपनीचा शेअर ३६१.१० रुपयांवर होता. जे ७ जून २०२४ रोजी ९७५.१० रुपयांवर पोहोचला. गेल्या ६ महिन्यांत कंपनीचा शेअर १४५% नी वधारला आहे. हा शेअर ७ डिसेंबर २०२३ रोजी ३९४ रुपयांवर होता. जो ७ जून २०२४ रोजी ९७५.१० रुपयांवर पोहोचला आहे. 

मार्च २०२४ तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीमध्ये  प्रमोटर्सचा वाटा ७३.०६ टक्के एवढा आहे. तर पब्लिक शेअरहोल्डिंग २६.९४ टक्के एढी आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक