Join us

Banking Crisis : याला म्हणतात संकटात संधी...! बुडालेली बँक एक डॉलरला विकत घेतली, आता झाला 1.5 अब्ज डॉलरचा प्रॉफिट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 6:18 PM

या बँकेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नफ्यात सिलिकॉन व्हॅली बँक यूके लिमिटेडच्या खरेदीतून झालेल्या 1.5 अब्ज डॉलर एवढ्या प्रॉव्हिजनल गेनचाही (provisional gain) समावेश आहे.

युरोपातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचएसबीसीने (HSBC) बँकिंग संकटात अक्षरशः खोऱ्याने पैसा कमावला आहे. खरे तर, अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक (Silicon Valley Bank) नुकतीच बुडाली. तिचा ब्रिटनमधील व्यवसाय एचएसबीसीने केवळ एक डॉलरमध्ये खरेदी केला होता. ही डील सरकार आणि बँक ऑफ इंग्लंडने करवून आणली होती. एचएसबीसीचे म्हटल्यानुसार,  मार्च तिमाहीत त्यांच्या नफ्यात 1.5 अब्ज डॉलर वाढ झाली आहे. या काळात बँकेने 12.9 अब्ज डॉलर एवढा प्री-टॅक्स प्रॉफिट कमावला आहे. या बँकेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नफ्यात सिलिकॉन व्हॅली बँक यूके लिमिटेडच्या खरेदीतून झालेल्या 1.5 अब्ज डॉलर एवढ्या प्रॉव्हिजनल गेनचाही (provisional gain) समावेश आहे.

बँकिंग सेक्टर संकटातून जात असतानाच एचएसबीसीने जबरदस्त परफॉरमेन्स दिला आहे. मार्च महिन्यात अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक (Signature Bank) अशा दोन बँका बुडाल्या आहेत. याच प्रकारे स्वित्झर्लंडची क्रेडिट सुइस (Credit Suisse) बँक देखील यूबीएस (UBS)च्या हाते विकली गेली आहे. याशिवाय अमेरिकेतील आणखी एक फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या (First Republic Bank) रेग्युलेटरने सीझ केले. हिचे अॅसेट्स जेपी मॉर्गन चेजला (JP Morgan Chase) विकण्यात आले आहेत. हे 2008 नंतर आतापर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट मानले जात आहे. तसेच येणाऱ्या काही दिवसांत आणखीही काही बँकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आशियातून सर्वाधिक फायदा -एचएसबीसीमध्ये चीनची इन्शुरन्स कंपनी पिंग इन (Ping In)चा सर्वात मोठा वाटा आहे. बँकेने आपला आशियातील बिझनेस वेगळा करावा, अशी चिनी कंपनीची इच्छा आहे. कारण बँकेचा अधिकांश प्रॉफिट आशिया खंडातूनच होतो. यातून युरोप आणि अमेरिकेतून होणारे नुकसान भरून निघते. पिंग इनचे म्हणणे आहे की, हे योग्य नाही. यामुळे, एचएसबीसीला वेगळे करणेच यावरील समाधान आहे. यामुळे आशियातील गुंतवणूकदारांना अधिक प्रॉफिट मिळेल. या प्रस्तावावर शुक्रवारी बर्मिंघम येथे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मतदान होईल. बँकेने शेअरहोल्डर्सना या निर्णयाला विरोध करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकइंग्लंडअमेरिकाचीनव्यवसाय