Lokmat Money > बिझनेस न्यूज > याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी

याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी

या कंपनीची स्थापना 1994 मध्ये झाली असून ती टेक्सटाइल इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ही कंपनी यार्न, फॅब्रिक आणि गारमेंट तयार करते. हिचे ऑफिस चेन्नईमध्ये आहे. BSE च्या वेबसाइटनुसरा कंपनीचे मार्केट कॅप 59.35 कोटी रुपये एवढे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 03:16 PM2024-11-05T15:16:47+5:302024-11-05T15:17:41+5:30

या कंपनीची स्थापना 1994 मध्ये झाली असून ती टेक्सटाइल इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ही कंपनी यार्न, फॅब्रिक आणि गारमेंट तयार करते. हिचे ऑफिस चेन्नईमध्ये आहे. BSE च्या वेबसाइटनुसरा कंपनीचे मार्केट कॅप 59.35 कोटी रुपये एवढे आहे.

This is called return gem spinners india ltd return double in just 1 month even in the falling market; Price less than rs 10 | याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी

याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी

शेअर बाजारात सध्या घसरण बघायला मिळत आहे. मात्र, या घसरणीच्या काळातही काही शेअर्स रॉकेट बनले आहेत. यांत अनेक पेनी स्टॉकचाही समावेश आहे. हे असे शेअर्स आहेत ज्यांनी फार कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. अशाच एका पेनी स्टॉकचे नाव आहे जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड (Gem Spinners India Ltd). या शेअरने अवघ्या एका महिन्यातच गुंतवणूकदारांचे पैसे डबल केल आहेत.

या शेअरची किंमत सध्या 10 रुपयांपेक्षाही कमी आहे. याने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ 30 दिवसांत म्हणजे एका महिन्यातच दुप्पट परतावा दिला आहे. या शेअरला गेल्या अनेक दिवसांपासून 2 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागत आहे. आज मंगळवारीही शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. मात्र, दुसरीकडे, आजही या स्टॉकला साधारणपणे 2 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले आहे.

हा शेअर सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर असून आज 9.67 रुपयांवर पोहोचला आहे. तर याचा नीचांक 3.27 रुपये एवढा आहे. तसेच या शेअरचा ऑल टाइम उच्चांक जवळपास 17 रुपये एवढा आहे. जो 2007 मध्ये होता.

एक लाखाचे केले दोन लाख - 
या शेअरने एका महिन्यात जवळपास 104 टक्क्यांचा परतावा दिला आहे. एक महिन्यापूर्वी या शेअरची किंमत 4.75 रुपये एवढी होती. आपण जर एक महिन्यापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर, आता त्याचे दोन लाख चार हजार रुपये झाले असते. 

काय करते कंपनी -
या कंपनीची स्थापना 1994 मध्ये झाली असून ती टेक्सटाइल इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ही कंपनी यार्न, फॅब्रिक आणि गारमेंट तयार करते. हिचे ऑफिस चेन्नईमध्ये आहे. BSE च्या वेबसाइटनुसरा कंपनीचे मार्केट कॅप 59.35 कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: This is called return gem spinners india ltd return double in just 1 month even in the falling market; Price less than rs 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.