Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' देशानं भारतीयांना व्हिसा फ्री एन्ट्री बंद करण्याचा घेतला निर्णय, हे आहे मोठं कारण

'या' देशानं भारतीयांना व्हिसा फ्री एन्ट्री बंद करण्याचा घेतला निर्णय, हे आहे मोठं कारण

१ जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. २०१७ मध्ये व्हिसा फ्री एन्ट्रीला सुरूवात करण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 02:21 PM2022-12-27T14:21:52+5:302022-12-27T14:25:06+5:30

१ जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. २०१७ मध्ये व्हिसा फ्री एन्ट्रीला सुरूवात करण्यात आली होती.

This is the big reason why this country has decided to stop visa free entry for Indian passport holders | 'या' देशानं भारतीयांना व्हिसा फ्री एन्ट्री बंद करण्याचा घेतला निर्णय, हे आहे मोठं कारण

'या' देशानं भारतीयांना व्हिसा फ्री एन्ट्री बंद करण्याचा घेतला निर्णय, हे आहे मोठं कारण

इलिगल मायग्रेशनवर नियंत्रण करणं आणि युरोपिय व्हिसा पॉलिसीचं पालन करण्यासाठी सर्बियाच्या सरकारनं भारतीयांसाठी व्हिसा फ्री ट्रॅव्हल संपवण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीनुसार, १ जानेवारी २०२३ पासून भारतीयपासपोर्टधारकांना आता वैध व्हिसाशिवाय सर्बियामध्ये प्रवास करण्याची मुभा नसेल.

यापूर्वी, राजनैतिक आणि अधिकारीक भारतीय पासपोर्ट धारकांना ९० दिवसांसाठी व्हिसाशिवाय देशात येण्याची परवानगी होती, तर सामान्य पासपोर्ट धारकांसाठी हा कालावधी ३० दिवसांचा होता. एका निवेदनात सरकारने म्हटले आहे की सर्बियामध्ये ३० दिवसांपर्यंत राहण्यासाठी सर्व भारतीय पासपोर्ट धारकांसाठी सर्बियामध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची विद्यमान व्यवस्था मागे घेण्यात आली आहे.

पाच वर्षांपासून होती व्हिसा फ्री एन्ट्री
सर्बियाने सप्टेंबर २०१७ मध्ये व्हिसा-फ्री प्रवेश सुरू केला होता. सर्बियाला जाणारे भारतीय सर्बियातील व्हिसा-फ्री प्रवेशाच्या आधारावर सर्बियाच्या शेजारील देशांसह इतर युरोपीय देशांमध्ये प्रवास करू शकत नाहीत. सर्बिया सरकारच्या घोषणेनंतर, बेलग्रेड येथील भारतीय दूतावास, सर्बियाने भारतीय नागरिकांना व्हिसा नियमांमधील बदलाविषयी माहिती जारी केली आहे. १ जानेवारी २०२३ पासून सर्बियामध्ये प्रवास करणाऱ्या सर्व भारतीयांना एन्ट्रीसाठी व्हिसाची आवश्यकता असेल.

Web Title: This is the big reason why this country has decided to stop visa free entry for Indian passport holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.