अदानी समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी अमेरिकेत झालेल्या आरोपांसंदर्भात पहिल्यांदाच भाष्य केले आहे. जयपूरमध्ये 51 व्या इंडिया जेम अँड ज्वेलरी अवॉर्ड्स शोवेळी ते बोलत होते.
काय म्हणाले अदानी? -
पुरस्कार सोहळ्यावेळी गौतम अदानी म्हणाले, "तुमच्यापैकी बहुतेकांनी हे वाचले असेल की दोन आठवड्यांपूर्वी आम्हाला अदानी ग्रीन एनर्जीमध्ये अनुपालन पद्धतींसंदर्भात अमेरिकेकडून आरोपांचा सामना करावा लागला. अशा आव्हानांना सामोरे जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मी आपल्याला सांगतो की, प्रत्येक आव्हान आपल्याला मजबूत बनवते. प्रत्येक अडथळा अदानी समूहासाठी पायरी बनतो."
ते पुढे म्हणाले, प्रत्येक राजकीय विरोधक आम्हाला आणखी बळ देतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, या प्रकरणात अदानी पक्षाकडून कुणावरही एफसीपीएचे उल्लंघन अथवा न्यायात अडथळा आणण्याच्या कोणत्याची षडयंत्राचा आरोप करण्यात आलेला नाही.
ही आमच्या प्रगतीची किंमत -
गौतम अदानी पुढे म्हणाले, "आजच्या जगात फॅक्ट्सच्या तुलनेत निगेटिव्हिटी अधिक वेगेने पसरते. आम्ही कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे काम करत आहोत. मात्र, गेल्या काही वर्षांत आम्हाला ज्या अडथळ्यांचा सामना करावा लागत, ती आमच्या प्रगतीची किंमत आहे. आपली स्वप्न जेवढे धाडसी असतील, तेवढेच जग तुमची अधिक छाननी करेल.
अमेरिकेत करण्यात आले होते असे आरोप -
अमेरिकेतील न्युयॉर्कच्या एका न्यायालयात, गौतम अदानींसह सात जणांविरोधात 265 मिलियन डॉलरची (2250 कोटी रुपयांच्या जवळपास) लाच दिल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. गौतम अदानीसह या सात जणांवर पुढील 20 वर्षांत 2 अब्ज डॉलर किमतीचे सोलर पॉवर प्रोजेक्ट मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना 265 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक लाच दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.