Lokmat Money > बिझनेस न्यूज > रॉकेट बनला 'हा' ₹5 चा स्टॉक, 2000% वाढला भाव; आता 1:2 बोनस शेअर मिळणार...

रॉकेट बनला 'हा' ₹5 चा स्टॉक, 2000% वाढला भाव; आता 1:2 बोनस शेअर मिळणार...

या मल्टीबॅगर शेअरने गेल्या वर्षभरात 3300% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 07:44 PM2024-11-06T19:44:37+5:302024-11-06T19:44:48+5:30

या मल्टीबॅगर शेअरने गेल्या वर्षभरात 3300% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

This ₹5 stock become Rocket, goes up 2000%; Now you will get 1:2 bonus share | रॉकेट बनला 'हा' ₹5 चा स्टॉक, 2000% वाढला भाव; आता 1:2 बोनस शेअर मिळणार...

रॉकेट बनला 'हा' ₹5 चा स्टॉक, 2000% वाढला भाव; आता 1:2 बोनस शेअर मिळणार...

Bonus Share : अमेरिकेतील निवडणूक निकालांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. अनेक शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढले. यामध्ये  मल्टीबॅगर स्टॉक आयुष वेलनेसच्या शेअर्सचाही समावेश होता. कंपनीच्या शेअर्सला आज 2% अप्पर सर्किट लागले अन् याची इंट्राडे उच्चांकी रु. 112.80 गाठली. ही या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत आहे. 

दरम्यान, कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे बोनस शेअर्सची घोषणा, हे कारण आहे. कंपनीने 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक दोनमागे तुम्हाला आयुष वेलनेसचा एक मोफत शेअर मिळेल. कंपनीने म्हटले आहे की, बुधवार(13 नोव्हेंबर 2024) रोजी बोर्ड सदस्यांची एक बैठक आयोजित केली जाणार आहे आणि आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीच्या आणि पहिल्या सहामाहीच्या निकालांवर विचार आणि मंजूरी दिली जाईल.

या वर्षी शेअर्स प्रचंड वाढले 
आयुष वेलनेस शेअर्समध्ये या वर्षात आतापर्यंत प्रचंड वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत कंपनीचे शेअर्स 2000% पेक्षा जास्त वाढले आहेत. या काळात त्याची किंमत 5 रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढली. गेल्या एका वर्षात 3300% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत 3.30 रुपये होती.

कंपनी निधी उभारणार 
आयुष वेलनेसने 1:2 च्या प्रमाणात त्यांच्या 1,62,25,000 इक्विटी भागधारकांसाठी बोनस जारी केला आहे, ज्याद्वारे शेअरधारकांना रेकॉर्ड तारखेला असलेल्या प्रत्येक 2 इक्विटी शेअर्ससाठी 1 बोनस इक्विटी शेअर मिळेल. आयुष वेलनेसने 49.90 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा केली आहे. आयुष वेलनेसने सांगितले की, यामुळे विद्यमान भागधारकांना कंपनीच्या निधी उभारणी कार्यक्रमात सहभागी होता येईल आणि विशेष अधिकार इश्यू किमतीचा फायदा होईल. 

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: This ₹5 stock become Rocket, goes up 2000%; Now you will get 1:2 bonus share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.