Lokmat Money > बिझनेस न्यूज > आजपासून बदलतोय IPO मार्केटचा 'हा' नियम, गुंतवणूकदारांना होणार जबरदस्त फायदा

आजपासून बदलतोय IPO मार्केटचा 'हा' नियम, गुंतवणूकदारांना होणार जबरदस्त फायदा

नवीन नियमांचा फायदा इश्यू जारी करणाऱ्यांसोबत गुंतवणूकदारांनाही होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 10:36 AM2023-12-01T10:36:13+5:302023-12-01T10:38:03+5:30

नवीन नियमांचा फायदा इश्यू जारी करणाऱ्यांसोबत गुंतवणूकदारांनाही होणार आहे.

This rule of IPO market is changing from today investors will get tremendous benefit sebi new rule mandatory | आजपासून बदलतोय IPO मार्केटचा 'हा' नियम, गुंतवणूकदारांना होणार जबरदस्त फायदा

आजपासून बदलतोय IPO मार्केटचा 'हा' नियम, गुंतवणूकदारांना होणार जबरदस्त फायदा

IPO Listing New Rules: आयपीओसंदर्भातील मोठा बदल शेअर बाजारात शुक्रवारपासून (१ डिसेंबर) लागू होणार आहे. नवीन नियमानुसार, T+3 नियम आजपासून आयपीओ लिस्टिंगसाठी अनिवार्य करण्यात आलाय. म्हणजे, १ डिसेंबरपासून सुरू होणारे सर्व आयपीओ इश्यू बंद झाल्यानंतर ३ दिवसांनी लिस्ट केले जातील. यापूर्वी, याची वेळ ६ दिवस (T+6) होती. बाजार नियामक सेबीने या वर्षी ऑगस्टमध्ये आयपीओ लिस्टिंगची मुदत कमी करण्याबाबत परिपत्रक जारी केलं होतं.

गुंतवणूकदारांना फायदा
आयपीओ लिस्टिंग आणि व्यवहाराची वेळ कमी केल्यानं इश्यू जारी करणाऱ्यांसोबत गुंतवणूकदारांना फायदा होईल. बाजार नियामक सेबीच्या या निर्णयामुळे, इश्यू जारी करणाऱ्यांना त्वरीत निधी उभारता येणार आहे. यामुळे व्यवसाय सुलभ होईल आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम आणि रोख रक्कम लवकरच मिळण्याची संधी मिळेल. इश्यूमधील अयशस्वी बिडर्सची रक्कम लवकरच बँकेतून अनब्लॉक केली जाईल. तसंच, यशस्वी बिडर्स लवकर लिस्टिंगच्या बाबतीत स्टॉकवर आपला पहिला निर्णय (Buy, Sell or Hold) लवकर घेऊ शकतील.

जूनमध्ये प्रस्तावाला मंजुरी
नियामकानुसार, एएसबीएच्या (अ‍ॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट) विलंबासाठी गुंतवणूकदारांना भरपाईची रक्कम T+3 दिवसापासून मोजली जाईल. सेबी बोर्डानं या वर्षी जूनमध्ये या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. १ सप्टेंबर किंवा त्यानंतर येणाऱ्या पब्लिक इश्यूच्या लिस्टिंगसाठी नवी कालमर्यादा वॉलेंटरी असेल. परंतु १ डिसेंबरनंतर येणआर्या इश्यूसाठी ही मर्यादा अनिवार्य असेल, असं सेबीनं आपल्या निवेदनात म्हटलं होतं.

Web Title: This rule of IPO market is changing from today investors will get tremendous benefit sebi new rule mandatory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.