Lokmat Money > बिझनेस न्यूज > महिलांसाठी Post Office ची ही स्कीम आहे सुपरहिट, गुंतवणूक केल्यास जमा होईल मोठा फंड

महिलांसाठी Post Office ची ही स्कीम आहे सुपरहिट, गुंतवणूक केल्यास जमा होईल मोठा फंड

पोस्ट ऑफिसच्या विशेष योजनेत गुंतवणूक करून महिलांना मोठा फंड जमा करता येऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 03:35 PM2023-09-11T15:35:59+5:302023-09-11T15:36:17+5:30

पोस्ट ऑफिसच्या विशेष योजनेत गुंतवणूक करून महिलांना मोठा फंड जमा करता येऊ शकतो.

This scheme of Post Office for women is a superhit if you invest you will accumulate a huge fund mahila sanman certificate | महिलांसाठी Post Office ची ही स्कीम आहे सुपरहिट, गुंतवणूक केल्यास जमा होईल मोठा फंड

महिलांसाठी Post Office ची ही स्कीम आहे सुपरहिट, गुंतवणूक केल्यास जमा होईल मोठा फंड

पोस्ट ऑफिसच्या विशेष योजनेत गुंतवणूक करून महिलांना मोठा फंड जमा करता येऊ शकतो. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही पोस्ट ऑफिसची एक योजना आहे, ज्याच्या माध्यमातून गुंतवणूक करून मोठा फंड तयार करता येऊ शकतो. या योजनेअंतर्गत (Post Office Mahila Samman Savings Certificate) महिलांना खातं उघडता येतं आणि त्या गुंतवणूक सुरू करू शकतात. हे देखील खूप सोपे आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेत तुम्ही गुंतवलेली रक्कम (Mahila Samman Savings Certificate) पूर्णपणे सुरक्षित राहते. तुम्ही या योजनेत एकापेक्षा जास्त खाती उघडू शकता.  ही योजना 1 एप्रिल 2023 रोजी सुरू झाली. या बचत योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये केली होती.

सध्या मिळतंय 7.5% व्याज
सध्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर 7.5 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात. यामध्ये किमान 1000 रुपये आणि त्यापुढील रक्कम 100 च्या पटीत गुंतवली जाऊ शकते. या योजनेत जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. जर एखाद्या महिलेला दोन योजना सुरू करायच्या असतील तर किमान 3 महिन्यांचे अंतर आवश्यक आहे.

ही एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. यामध्ये व्याजाची गणना तिमाही चक्रवाढ आधारावर केली जाते. योजनेच्या शेवटी एकूण व्याज दिलं जातं. खाते उघडल्यानंतर 1 वर्षानंतर 40 टक्के रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.

प्री क्लोजरबाबत काय नियम?
प्री-मॅच्युअर क्लोजरबाबत काही अटी आहेत. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा पालकाचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केलं जाऊ शकतं.

Web Title: This scheme of Post Office for women is a superhit if you invest you will accumulate a huge fund mahila sanman certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.