पीएम विश्वकर्मा योजना लॉन्च झाल्यानंतर, केवळ 10 दिवसांच्या आतच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तब्बल 1.40 लाखहून अधिक अर्ज आले आहेत, असे केंद्रिय सुक्ष्म, लघू तथा मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. राणे यांनी एक्सवर (आधीचे ट्विटर) म्हटले आहे की, पीएम विश्वकर्मा योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे आणि ती लॉन्च झाल्यानंतर केवळ दहा दिवसांतच एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होणे, हे या योजनेच्या यशाचे प्रमाण आहे.
राणे म्हणाले, आपल्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विश्वकर्मा बंधू-भगिनींच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजना मैलाचा दगड सिद्ध होईल.
काय फायदे मिळणार -या योजनेंतर्गत, लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. तसेच प्रशिक्षणादरम्यान त्यांना रोज 500 रुपये मानधनही दिले जाणार आहे. नवी साधने खरेदी करण्यासाठी सरकार त्यांना 15 हजार रुपयांची मदतही करेल. याशिवाय, हे लाभार्थी तीन लाख रुपयंपर्यंतचे गॅरंटी मुक्त कर्जासाठीही पात्र असतील.
या लोकांना मिळणार फोयदा -या योजनेंतर्गत चर्मकार, गवंडी, सोनार, शिंपी, सुतार, शिल्पकार, जाळी तयार करणे, कुंभार, टेलर, लोहार आदी 18 पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. हे व्यवसाय करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.