Join us

टाटाचा 'हा' स्टॉक करू शकतो कमाल, राकेश झुनझुनवालांनी केली आहे मोठी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 2:25 PM

टाटा मोटर्सच्या (Tata Motars) शेअरची किंमत मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. 2022 मध्ये तर शेअरची किंमत 13 टक्क्यांनी घसरली. मात्र, ...

टाटा मोटर्सच्या (Tata Motars) शेअरची किंमत मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. 2022 मध्ये तर शेअरची किंमत 13 टक्क्यांनी घसरली. मात्र, असे असतानाही शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हणवल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा, या कंपनीवरील विश्वास कायम आहे. यामुळेच त्यांनी टाटा मोटर्समधील आपली हिस्सेदारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, निफ्टी ऑटो इंडेक्सने नुकतेच 11,000 च्या पातळीवर ब्रेकआउट दिला आणि तो 11,100 वर कायम आहे. तसेच, सेमीकंडक्टरची उपलब्धता येणाऱ्या सत्रांत राकेश झुनझुनवाला यांचा स्टॉक आणि इतर काही ऑटो स्टॉक्सना प्रोत्साहन देऊ शकते.

किती रुपयांपर्यंत पोहोचू शकतो शेअर - लाइव्ह हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, टाटा मोटर्स (Tata Motors Outlook) च्या कामगिरीसंदर्भात बोलताना चॉइस ब्रोकिंगचे सुमित बगाडिया म्हणाले, 'निफ्टी ऑटो इंडेक्सने 11 हजारच्या पातळीवर ब्रेकआउट दिला असून तो 11,100 पातळीवर कायम राहील. राकेश झुनझुनवाला यांचा हा शेअर सध्या 430 रुपयांपर्यंतच्या घसरणीवर खरेदी करण्या योग्य आहे. येणाऱ्या काळात हा स्टॉक 470 रुपये ते 480 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.'

राकेश झुनझुनवाला यांची हिस्सेदारी किती? जानेवारी ते मार्च 2022 पर्यंतच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 3,92,50,000 शेअर्स, म्हणजेच जवळपास 1.18 टक्के हिस्सेदारी आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाही दरम्यानही टाटा मोटर्समध्ये त्यांचा एवढाच वाटा होता. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

 

टॅग्स :राकेश झुनझुनवालाटाटाशेअर बाजारशेअर बाजार