Lokmat Money > बिझनेस न्यूज > तीन महिन्यांत 2400 रुपयांच्याही पुढे जाणार हा स्टॉक! बिग बुल यांचीही पसंती

तीन महिन्यांत 2400 रुपयांच्याही पुढे जाणार हा स्टॉक! बिग बुल यांचीही पसंती

याचमुळे स्थानिक ब्रोकरेज आणि कंपन्या आयसीआयसीआय सिक्युरिटीज टायटनच्या स्टॉकला घेऊन आशावादी दिसत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 11:55 PM2022-07-20T23:55:37+5:302022-07-20T23:56:40+5:30

याचमुळे स्थानिक ब्रोकरेज आणि कंपन्या आयसीआयसीआय सिक्युरिटीज टायटनच्या स्टॉकला घेऊन आशावादी दिसत आहेत

This stock of Tata will go beyond 2400 rupees in three months! Big Bull's Rakesh Zunzunwala favorite too | तीन महिन्यांत 2400 रुपयांच्याही पुढे जाणार हा स्टॉक! बिग बुल यांचीही पसंती

तीन महिन्यांत 2400 रुपयांच्याही पुढे जाणार हा स्टॉक! बिग बुल यांचीही पसंती

मुंबई - शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या आवडत्या स्टॉकसंदर्भात बोलायचे झाल्यास, त्यात टाटा समूहाच्या टायटनचाही उल्लेख करावा लागेल. या वर्षी टायटनच्या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. काही वेळा शेअरमध्ये विक्रीचे वातावरण राहिले खरे, मात्र, असे असले तरी आता पुन्हा एकदा हा स्टॉक रिकव्हरीच्या दिशेने धावू लागला आहे.

याचमुळे स्थानिक ब्रोकरेज आणि कंपन्या आयसीआयसीआय सिक्युरिटीज टायटनच्या स्टॉकला घेऊन आशावादी दिसत आहेत. टायटन चांगलं मार्केट घेईन, असे ब्रोकरेजर्सना वाटते. कारण, गेल्या तीन महिन्याच्या घसरणींनंतर आता रिकवरी येत आहे. त्यामुळेच, टायटनचा शेअर 2400 रुपयांचा आकडा पार करेल, अशी आशा आहे. 

कुठपर्यंत येईल भाव

टायटनचे शेअर आपल्या सध्याचा बाजारभाव याच गतीने ठेवतील आणि 2480(टार्गेट प्राईस ) कडे पोहोचेल. ज्यामध्ये 2045 चा स्टॉप लॉस ठेवण्यात आला आहे. त्याचा ग्रोथ कालावधी 3महिने आहे. दरम्यान, बुधवारी मार्केटमध्ये हा शेअर 2270.10रुपयांवर पोहोचला होता. जी एका दिवसाच्या तुलनेत 1.36 टक्क्यांची वाढ होती. त्यानुसार ग्रोथ राहिल्यास पुढील 3 महिन्यात 200 रुपयांची वाढ होईल.

टायटनमध्ये राकेश झूनझूनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झूनझूनवाला यांची भागीदारी आहे. अनुक्रमे ही भागीदारी 3.98% आणि 1.07% एवढी आहे.

Web Title: This stock of Tata will go beyond 2400 rupees in three months! Big Bull's Rakesh Zunzunwala favorite too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.