Join us

Vodafone idea साठी हा आठवडा महत्त्वाचा, स्पेक्ट्रमचा हप्ता न भरल्यास अलोकेशन रद्द होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 12:38 PM

व्होडाफोन आयडिया (Vodafone-Idea) ही कंपनी सध्या आर्थिक समस्यांचा सामना करत आहे.

दूरसंचार क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेली व्होडाफोन आयडिया (Vodafone-Idea) ही कंपनी सध्या आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. हा नवा आठवडा व्होडाफोन आयडियासाठी अतिशय महत्त्वाचा असणारे. या आठवड्यातच कंपनीत नवी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे आणि असं न झाल्यास कंपनीसमोर संकट उभं राहू शकतं. याच आठड्यात कंपनीला 5G स्पेक्ट्रमचा हप्ताही द्यायचा आहे. असं न झाल्यास कंपनीसमोर संकट उभं राहू शकतं.

कंपनीला याच आठवड्यात सरकारला १७०० कोटी रुपये द्यायचे आहेत. इतकंच नाही तर १७ सप्टेंबर कंपनीला व्याजासह ही रक्कम सरकारला द्यावी लागणारे. मनी कंट्रोलनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. यासोबतच कंपनीला 5G स्पेक्ट्रमचा हप्ताही द्यायचा आहे. हा हप्ता न भरल्यास कंपनीचं अलोकेशन रद्द होऊ शकतं.

प्रमोटर्सकडून गुंतवणूकीचं आश्वासनकंपनीला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी प्रमोटर्सनं २ हजार कोटी रुपयांच्या इक्विटी गुंतवणूकीचं आश्वासन दिलं होतं. परंतु ही २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पुरेशी नसल्याचं म्हणणं आहे. दरम्यान, यामुळे कंपनीला अन्य ठिकाणाहूनही पैसा उभा करावा लागणार आहे.

वर्षाला ४० हजार कोटींची गरजकंपनीला मोरेटोरियम पीरिअडनंतर वार्षित ४० हजार कोटी रुपयांची गरज भासणार आहे. दरम्यान, यासाठी अनेक बँकर्सशी चर्चाही सुरुये. परंतु बँकर्सकडून डील अंतिम झालेली नाही. आतापर्यंत या डीलवर मंजुरी मिळालेली नाही.

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)व्यवसाय