Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोकरी देणारी कंपनीच करणार कर्मचाऱ्यांची मोठी कपात, यापूर्वी अनेक कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ

नोकरी देणारी कंपनीच करणार कर्मचाऱ्यांची मोठी कपात, यापूर्वी अनेक कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ

टेक्नॉलॉजी सेक्टरनं २०२३ च्या पहिल्या सहामाहीत १४१,५१६ कर्मचाऱ्यांना कमी केलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 03:38 PM2023-10-17T15:38:25+5:302023-10-17T15:38:32+5:30

टेक्नॉलॉजी सेक्टरनं २०२३ च्या पहिल्या सहामाहीत १४१,५१६ कर्मचाऱ्यांना कमी केलंय.

this-year-1-41-lakh-job-cuts-in-fy2023-linkedin-lays-off-668-employees-in-again | नोकरी देणारी कंपनीच करणार कर्मचाऱ्यांची मोठी कपात, यापूर्वी अनेक कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ

नोकरी देणारी कंपनीच करणार कर्मचाऱ्यांची मोठी कपात, यापूर्वी अनेक कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ

प्रोफेशनल प्लॅटफॉर्म LinkedIn नं पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी ३ टक्के कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांना रोजगार गमवावा लागणार आहे. याआधीही लिंक्डइनने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली होती. दरम्यान, टेक्नॉलॉजी सेक्टरनं २०२३ च्या पहिल्या सहामाहीत १४१,५१६ कर्मचाऱ्यांना कमी केलंय.

दुसऱ्या टप्प्यात आपल्या इंजिनिअरिंग आणि फायनान्सटीमधील ६६८ कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार असल्याचं लिंक्डइननं सांगितलं. यासाठी आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्यात आल्याचंही सांगण्यात आलंय.

अनेकांनी नोकऱ्या गमावल्या
लिंक्डइनच्या (LinkedIn) या कर्मचारी कपातीच्या प्रक्रियेमुळे एकूण २० हजार कर्मचार्‍यांपैकी ३ टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी प्रभावित होतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यातील बहुतांश कर्मचारी हे फायनान्स आणि इंजिनिअरिंग टीममधील असतील. आर्थिक अनिश्चिततेमुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील हजारो लोकांनी यावर्षी नोकऱ्या गमावल्या आहेत.

एम्प्लॉयमेंट फर्म चॅलेंजर ग्रे अँड ख्रिसमसच्या मते, तंत्रज्ञान क्षेत्रानं २०२३ च्या पहिल्या सहामाहीत १४१,५१६ कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. तर वर्षभरापूर्वी सहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं होतं. या क्षेत्रात अजूनही अधूनमधून कर्मचारी कपात केली जात आहे.

Web Title: this-year-1-41-lakh-job-cuts-in-fy2023-linkedin-lays-off-668-employees-in-again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी