Lokmat Money > बिझनेस न्यूज > यंदा सणासुदीच्या काळात सुमारे १० लाख रोजगार निर्माण होणार

यंदा सणासुदीच्या काळात सुमारे १० लाख रोजगार निर्माण होणार

किरकोळ विक्री, आतिथ्य, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स, ग्राहक वस्तू, बँकिंग, वित्तीय सेवा, विमा यांसह अनेक उद्योगांत भरती होण्याची शक्यता आहे, असे अहवालात म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 02:26 PM2024-10-15T14:26:35+5:302024-10-15T14:26:56+5:30

किरकोळ विक्री, आतिथ्य, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स, ग्राहक वस्तू, बँकिंग, वित्तीय सेवा, विमा यांसह अनेक उद्योगांत भरती होण्याची शक्यता आहे, असे अहवालात म्हटले आहे.

This year, around 10 lakh jobs will be created during the festive season | यंदा सणासुदीच्या काळात सुमारे १० लाख रोजगार निर्माण होणार

यंदा सणासुदीच्या काळात सुमारे १० लाख रोजगार निर्माण होणार

 

नवी दिल्ली : भारतातील सणासुदीच्या हंगामास उत्साहात सुरुवात झाली असून, यंदा सणासुदीच्या काळात सुमारे १० लाख रोजगार निर्माण होतील, असा अंदाज आहे. ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात हंगामी कामगारांना भरती केले जाण्याची शक्यता आहे. ‘एनएलबी सर्व्हिसेस’ने जारी केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. 

विविध क्षेत्रांत वस्तूहाताळणीचे काम वाढल्याने मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. ‘एनएलबी सर्व्हिसेस’चे सीईओ सचिन अलग म्हणाले की, ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक भरती होईल. मागच्या वर्षीच्या तुलनेत २२ टक्के अधिक भरती या क्षेत्रात होऊ शकते.

या पदांसाठी भरती
७० टक्के नोकऱ्या हंगामी, तर ३० टक्के कायमस्वरूपी असतील. यात गोदाम कर्मचारी, साठा व्यवस्थापक, लॉजिस्टिक्स समन्वयक आदी पदांचा समावेश आहे. शिखर मागणी काळात रॅपिड कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ‘गिग डिलिव्हरी रायडर्स’ची मागणी ३० टक्के वाढू शकते.
 

Web Title: This year, around 10 lakh jobs will be created during the festive season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.