Join us

यंदाही गल्ल्यात नाेटा घटल्या, सणांमध्ये डिजिटललाच पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 1:36 PM

ऑनलाइन व्यवहार वाढले; यूपीआयच्या माध्यमातून ८५ काेटी व्यवहार

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  दिवाळीमध्ये इलेक्ट्राॅनिक्स वस्तू, माेबाइल, कपडे, साेने आणि दागिन्यांसह अनेक वस्तूंची जाेरदार खरेदी हाेते. यावेळीही लाखाे काेटींचे व्यवहार झाले. मात्र, लाेकांनी सणासुदीच्या खरेदीसाठी राेखीऐवजी डिजिटल पर्यायांना पसंती दिली आहे. सलग दुसऱ्या वर्षी असे चित्र दिसत आहे. एसबीआयच्या एका अहवालातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

एसबीआयने ‘इकाेरॅप रिसर्च’ या नावाने अहवाल सादर केला आहे. ऑक्टाेबरमध्ये यूपीआयच्या माध्यमातून ८५.३ काेटी व्यवहार झाले. त्यातून १ लाख ३६ हजार काेटी रुपयांची उलाढाल झाली. 

...म्हणून यूपीआय झाले यशस्वीयूपीआयच्या डिजिटल प्रवासाच्या यशामागे सरकारने अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी केलेले प्रयत्न कारणीभूत आहेत.यूपीआय, वाॅलेट, पीपीआय यासारख्या यंत्रणांमुळे डिजिटल व्यवहार साेपे आणि स्वस्त बनविले आहे. ज्यांच्याकडे बॅंक खाते नाहीत, त्यांच्यासाठीदेखील हे साेपे आहे. 

अहवालात गेल्या २० वर्षांपासून दिवाळीच्या आठवड्यादरम्यान चलनातील राेखीचाही आढावा घेण्यात आला आहे. गेल्या दाेन वर्षांमध्ये राेखीचे प्रमाण घटले आहे. तर काेराेनामुळे २०२१ मध्ये राेखीचे प्रमाण वाढले हाेते. यापूर्वी २००९मध्ये जागतिक मंदीमुळे किरकाेळ घट झाली हाेती.

काय सांगते आरबीआयची आकडेवारी?

१७ नाेव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात राेखीचे प्रमाण घटले.

३३.६ लाख काेटी रुपयांची राेख बाजारात हाेती.

२२,७१२ काेटी रुपयांची राेख बाजारातून या आर्थिक वर्षात घटली आहे.

टॅग्स :व्यवसाय