नवे आर्थिक वर्ष लवकरच सुरू हाेणार असून नाेकरदार वर्गाला वेतनवाढीचे वेध लागले आहेत. यंदा भारतात सरासरी ९.५ टक्के वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. २०२३ मधील ९.७ टक्के वास्तविक वेतनवाढीच्या तुलनेत ही वेतनवाढ थोडी कमी असली तरी जगातील प्रमुख देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
जागतिक व्यावसायिक (प्रोफेशनल) सेवादाता कंपनी ‘एऑन पीएलसी’ने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, कोरोना साथीच्या नंतर २०२२ मध्ये सर्वाधिक १० टक्के वेतनवाढ मिळाली होती. त्यानंतर वेतनवाढीविषयीची स्थिती कमजोर झाल्याचे दिसून येत आहे.
काेणत्या क्षेत्रात किती पगारवाढ?उत्पादन १०.१%जैवविज्ञान ९.९%वित्तीय संस्था ९.९%रसायन ९.७%व्यावसायिक सेवा ९.७%एफएमसीजी ९.६%टेक्नाॅलाॅजी ९.५%ई-काॅमर्स ९.२%रिटेल ८.४%औद्याेगिक सेवा ८.२%
वेतनवाढीवर हाेणार युद्धांचा परिणाम
भू-राजकीय तणावामुळे जगातील अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांच्या वेतन वृद्धीवर यंदा परिणाम हाेऊ शकताे. त्या तुलनेत भारताच्या वेतन वृद्धीवरील परिणाम कमी आहे. त्यामुळे भारतातील वेतन वृद्धी सर्वाधिक राहू शकते. अहवालात ४५ उद्योगांतील १,४१४ कंपन्यांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे.