मुंबई/ नवी दिल्ली : आर्थिक व्यवहार पारदर्शी करण्याच्या मोहिमेंतर्गत मुंबई शेअर बाजाराचा आपल्या प्लॅटफॉर्मवरून १ हजारपेक्षा जास्त कंपन्यांच्या शेअर्सची नोंदणी हटविण्याचा प्रस्ताव आहे. वेगवेगळ्या दंडात्मक कारवाईमुळे या कंपन्यांचे शेअर्स सात वर्षांपासून व्यवहारांसाठी निलंबित आहेत. हा प्रस्ताव एक्स्चेंजने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाकडे (सेबी) पाठविला आहे. या कंपन्यांना त्यांचे शेअर बाहेर काढून घेण्यासाठी पुरेसा वेळ देऊन शेअर हटविले जाऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या कंपन्या नोंदणी नियमांचे पालन करण्यास इच्छुक नाहीत त्यांची नोंदणी समाप्त करावी, अशी बाजार नियामकांची भूमिका आहे. या उपाययोजनेतून भागधारकांचे हित जपण्याचाच बाजार नियामकांचा प्रयत्न आहे.
आशियातील सगळ्यात जुना बाजार बाँबे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) गुरुवारी १४० वर्षांचा झाला.
महिला संचालकपदे भरा
केंद्रीय सार्वजनिक कंपन्यांच्या (सीपीएसई) संचालक मंडळावरील महिलांची आणि रिक्त असलेली सगळी पदे भरावीत, असे बाजार नियंत्रक सेबीने सरकारला म्हटले. सगळ्या नोंदणीकृत कंपन्यांनी (खासगी आणि सार्वजनिक) आपल्या संचालक मंडळावर किमान एक महिला संचालक नियुक्त करणे बंधनकारक असून त्याची मुदत ३१ मार्च २०१५ रोजीच संपली आहे.
हजारपेक्षा जास्त कंपन्यांचे शेअर्स यादीतून हटविणार
आर्थिक व्यवहार पारदर्शी करण्याच्या मोहिमेंतर्गत मुंबई शेअर बाजाराचा आपल्या प्लॅटफॉर्मवरून १ हजारपेक्षा जास्त कंपन्यांच्या शेअर्सची नोंदणी हटविण्याचा प्रस्ताव आहे
By admin | Published: July 10, 2015 01:06 AM2015-07-10T01:06:37+5:302015-07-10T01:06:37+5:30