Join us  

हजारो तरुण उतरले बांधकामाच्या धंद्यात! का झाली वाढ? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 10:48 AM

काेराेना काळात साेशल डिस्टन्सिंगमुळे रिअल इस्टेट आणि हाउसिंग कंपन्यांनी ऑनलाइन प्राॅपर्टी प्रमाेशन आणि विक्रीवर जास्त भर दिला. 

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत देशात माेठ्या प्रमाणावर स्टार्टअप सुरू झाले. सरकारने या क्षेत्राला प्राेत्साहन देण्यासाठी विविध याेजना राबविल्याचा हा परिणाम आहे. यात सर्वाधिक स्टार्टअप्स हे फिनटेक म्हणजे आर्थिक उलाढालीसंबंधी आणि रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील स्टार्टअप्समध्ये ७ वर्षांत ७०० टक्के वाढ झाली आहे.

का झाली वाढ ?- काेराेना काळात साेशल डिस्टन्सिंगमुळे रिअल इस्टेट आणि हाउसिंग कंपन्यांनी ऑनलाइन प्राॅपर्टी प्रमाेशन आणि विक्रीवर जास्त भर दिला. - त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील स्टार्टअप्समध्ये माेठी वाढ दिसून आली.

२०१६ मध्ये केवळ २ स्टार्टअप- प्राॅपर्टी कन्सल्टंट फर्म एनाराॅकच्या अहवालानुसार देशात २०१६ मध्ये केवळ २ रिअल इस्टेट स्टार्टअप हाेते. - २०२२ मध्ये त्यांची संख्या १,४०० पेक्षा जास्त झाली आहे. त्यापैकी ३० टक्के प्री-सीड स्टेजमध्ये आहेत. - तर ५६ टक्के स्टार्टअप्सला गुंतवणूकदारांकडून भरपूर निधी मिळत आहे.

८४% वाटा हाउसिंग सेक्टरचा एकूण अंडर कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट क्षेत्रात.७००-८०० कंपन्यांचा १३ टक्के वाटा प्राॅप-टेक स्टार्टअप्समध्ये २००% वार्षिक दराने प्राॅप-टेक स्टार्टअपची वाढ.९०% ग्राहक प्राॅपर्टीचा शाेध ऑनलाइन घेतात.५१% लाेक ऑनलाइन खरेदीपर्यंत जातात.

टॅग्स :व्यवसायबांधकाम उद्योग