जळगाव : आठवड्याच्या सुरुवातीपासून घसरण होत गेलेल्या सोने-चांदीच्या भावात शनिवारी सलग दुसºया दिवशी वाढ झाली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात आणखी घसरण होऊन डॉलर ७५.६२ रुपयांवर पोहोचले. तसेच कोरोनामुळे मुंबईतील दुकाने बंद असल्याने व तेथून आवकही थांबली. यामुळे सोने पुन्हा एक हजार रुपयांनी वधारून ४३ हजार रुपये प्रती तोळा तर चांदीत ८०० रुपयांनी वाढ होऊन ती ३९ हजार रुपये प्रती किलोवर पोहोचली.
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक मागणी घटत असल्याने या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीचे भाव कमी-कमी होत गेले होते. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिणामही भाववाढीस कारणीभूत ठरत आहे. दोन दिवसांपासून अमेरिकन डॉलर वधारत आहे. शुक्रवारी डॉलर ७५.२० रुपयांवर व शनिवारी ७५.६२ रुपयांवर पोहोचल्याने सोने-चांदीचे भाव वाढत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन डॉलर वधारत असताना व दुसरीकडे कोरोनामुळे मुंबईतील दुकाने बंद असल्याने सोने-चांदीची आवक थांबली आहे. या दोन्ही कारणांमुळे भाव वाढत आहे.
- अजयकुमार ललवाणी,
अध्यक्ष, जळगाव सराफ बाजार असोसिएशन, जळगाव.
सोन्यात सलग दुसऱ्या दिवशी हजाराची वाढ; ४३ हजारांवर पोहोचले, डॉलरही वधारला
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक मागणी घटत असल्याने या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीचे भाव कमी-कमी होत गेले होते.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 12:46 AM2020-03-22T00:46:44+5:302020-03-22T04:32:12+5:30