Join us

चिनी उत्पादनाचा जागतिक अर्थव्यवस्थेला धोका

By admin | Published: February 23, 2016 1:41 AM

युरोपीय युनियन चेंबर आॅफ कॉमर्सने (एएफपी) चीनमधीलच कारखान्यांत होणाऱ्या अनिर्बंध उत्पादनावर प्रखर ताशेरे ओढले आहेत. चीनमधील अतिरिक्त उत्पादनामुळे जागतिक

बीजिंग : युरोपीय युनियन चेंबर आॅफ कॉमर्सने (एएफपी) चीनमधीलच कारखान्यांत होणाऱ्या अनिर्बंध उत्पादनावर प्रखर ताशेरे ओढले आहेत. चीनमधील अतिरिक्त उत्पादनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याचे एएफपीने केलेल्या एका सर्वेक्षणात म्हटले आहे. विशेषत: चीनमधील अनिर्बंध पोलाद उत्पादनामुळे जगातील पोलाद उद्योगाचे कंबरडेच मोडल्याचे एएफपीच्या अहवालात म्हटले आहे.एएफपीने आपल्या अहवालात म्हटले की, बाजारातील मागणीच्या कैक पटीने जास्त पोलादाचे उत्पादन चिनी कंपन्या करीत आहेत. चीनमधील कंपन्यांतील पोलादाचे उत्पादन इतके जास्त आहे की, जपान, भारत, अमेरिका आणि रशिया या देशांतील एकत्रित पोलाद उत्पादनापेक्षाही ते जास्त भरेल.विशेष म्हणजे जपान, भारत, अमेरिका आणि रशिया हे जगातील प्रमुख मोठे स्टील उत्पादक देश आहेत. तरीही या चार देशांतील एकूण पोलाद उत्पादन चीनमधील पोलाद उत्पादनापेक्षा कमी भरेल. यावरून चीनच्या अफाट उत्पादनाची कल्पना आहे. इतकेच नव्हे, तर चीनमधील हे पोलाद अत्यंत स्वस्त दरात उत्पादित होत आहे. त्याचा परिणाम म्हणून जगभरात पोलादाच्या किमती उतरत आहेत. त्याचा फटका पोलाद कंपन्यांना बसत आहे. अमेरिकेने संपूर्ण २0 व्या शतकात जेवढे सिमेंट उत्पादित केले, त्यापेक्षा जास्त सिमेंट चीनने गेल्या दोन वर्षांत उत्पादित केले आहे. चीनमधील उद्योग किती अजस्र आहेत, याची यावरून कल्पना यावी.युरोपीय युनियन चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष जॉर्ज वुतके यांनी सांगितले की, अनिर्बंध उत्पादन क्षमता अर्थव्यवस्थेची एक समस्याच आहे. चीनमध्ये सध्या ही समस्या अजस्र रूप धारण करून बसली आहे. वाईट बाब म्हणजे या समस्येवर चीनने अद्याप कोणताही तोडगा काढलेला नाही. स्वस्त आयातविरोधी चौकशीब्रुसेल्सने चीनमधील पोलादाच्या आयातीविरुद्ध डंपिंगविरोधी चौकशी सुरू केली आहे. जागतिक पातळीवर किमती उतरल्यामुळे युरोप आणि आशिया खंडातील पोलाद उत्पादक देश त्रस्त झाले आहेत. मागणीच्या तुलनेत अधिक उत्पादन हे त्यामागील प्रमुख कारण आहे. अहवालातील माहितीनुसार, अतिरिक्त उत्पादनामुळे खुद्द चीनमधील उद्योगही संकटात आहेत. चीनमधील ६0 टक्क्यांपेक्षा जास्त अ‍ॅल्युमिनियम उद्योगांकडील रोख आटत चालली आहे.