Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश अंबानींना पुन्हा धमकी! सात दिवसांत चौथ्यांदा शादाब खानच्या नावाने आला मेल

मुकेश अंबानींना पुन्हा धमकी! सात दिवसांत चौथ्यांदा शादाब खानच्या नावाने आला मेल

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांना चौथ्यांदा धमकीचा मेल आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 12:01 PM2023-11-04T12:01:39+5:302023-11-04T12:02:01+5:30

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांना चौथ्यांदा धमकीचा मेल आला आहे.

Threat to Mukesh Ambani again! For the fourth time in seven days, a mail came in the name of Shadab Khan | मुकेश अंबानींना पुन्हा धमकी! सात दिवसांत चौथ्यांदा शादाब खानच्या नावाने आला मेल

मुकेश अंबानींना पुन्हा धमकी! सात दिवसांत चौथ्यांदा शादाब खानच्या नावाने आला मेल

देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांना चौथ्यांदा धमकीचा मेल आला आहे. यावेळी दोन धमकीचे मेल आले आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख शादाब खान अशी दिली आहे. मुकेश अंबानींना गेल्या ७ दिवसात ४ वेळा धमक्या आल्या आहेत. या नवीन मेलमध्ये अंबानी यांनी ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान पाठवलेल्या ईमेलकडे आणि पैशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धमकीचा मेल आला होता तो बेल्जियममधील एका सर्व्हरवरून एकाच ईमेल आयडीवरून दोन ईमेल आले होते. याआधीही मुकेश अंबानी यांना एकाच ईमेल आयडीवरून आणि शादाब खानकडून तीन धमकीचे मेल आले होते.

भारतीय लसणामुळे ‘ड्रॅगन’ला ठसका; भारताने चीनचे टेंशन वाढविले

शनिवार २७ ऑक्टोबर रोजी धमकी देणाऱ्या व्यक्तीने २० कोटी रुपये मागितले होते आणि दुसऱ्या दिवशी त्याने ते २०० कोटी रुपयांची मागणी केली. यानंतर, तिसऱ्या मेलमध्ये धमकी देणाऱ्याने खंडणीची रक्कम ४०० कोटी रुपयांपर्यंत वाढवली. पोलिस मला शोधू शकणार नाहीत तर मला अटक करू शकत नाही, असेही लिहिले आहे. ज्या पत्त्यावरून पूर्वीचे ईमेल आले होते त्याच पत्त्यावरून हा ईमेलही आला आहे.

मुंबई पोलीस अजूनही इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजेच जुन्या ईमेलचा आयपी पत्ता शोधत आहेत. पोलिसांनी इंटरपोलच्या माध्यमातून या ईमेलच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी बेल्जियन व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क कंपनीची मदत मागितली आहे. हे मेल shadabkhan@mailfence.com वरून पाठवण्यात आले आहेत. 

तांत्रिक तज्ज्ञांच्या मते हा आयपी अॅड्रेस बेल्जियमचा आहे. पण पोलिसांना संशय आहे की धमकी देणारी व्यक्ती इतर कोणत्यातरी देशात स्थित आहे, आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बेल्जियमचे आभासी खासगी नेटवर्क वापरत आहे.

मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी ५ ऑक्टोबरला एका व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात फोन करून अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तीला बिहारमधून अटक करण्यात आली. राकेश कुमार शर्मा असे त्याचे नाव आहे.

Web Title: Threat to Mukesh Ambani again! For the fourth time in seven days, a mail came in the name of Shadab Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.