नवी दिल्ली: आपल्या हॉटेलच्या लिलावास स्थगिती देण्याची मागणी करणारी टाटा समूहाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज फेटाळली. नवी दिल्ली महापालिकेने तीन पंचताराकीत हॉटेल्सची लिलाव प्रक्रिया घोषित केली आहे. ताज मानसिंग हॉटेलचा यात समावेश आहे. हे हॉटेल ३३ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिले जाणार आहे.
टाटा समूहाच्या आयएचसीएलकडून सध्या ताज मानसिंग हॉटेलचे संचालन होते. आता दि कॅनॉट, हॉटेल एशियन इंटरनॅशनल या दोन हॉटेलचीही लिलाव प्रक्रिया १५ मे ते ७ जून दरम्यान केली जाईल.
'ताज मानसिंग'सह तीन हॉटेल्सचा लिलाव होणार
हे हॉटेल ३३ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिले जाणार आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:06 AM2018-05-23T00:06:19+5:302018-05-23T00:06:19+5:30