नवी दिल्ली : तीन वैमानिकांना विमानउड्डाणासंदर्भातील सुरक्षा नियमांचा भंग केल्याप्रकरणी नागरी उड्डाण महासंचालनालयाने निलंबित केले. त्यात एअर इंडियाचा एक व स्पाईसजेटच्या दोघांचा समावेश आहे. त्यांना पुढील सहा महिने उड्डाण परवाने वापरता येणार नाहीत.कोलकाता विमानतळावर २ जुलै रोजी विमान उतरवताना धावपट्टीच्या कडेला असलेल्या दिव्यांचे नुकसान केल्याप्रकरणी स्पाईस जेटच्या आरती गुणशेखरन व सौरभ गुलिया यांना सहा महिन्यांसाठी निलंबित केले. पुणे येथून कोलकाताला आलेले हे विमान धावपट्टीपासून १३०० फूट आधीच जमिनीवर उतरले. विमान धावपट्टीवर मध्यवर्ती रेषेच्या उजव्या अंगाला सरकत पुढे गेल्याने तेथील दिव्यांचे नुकसान झाले होते.
सुरक्षा नियमांचा भंग केल्याने तीन वैमानिक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 4:31 AM