Join us

सहापैकी तीन बँकांचा नफा घटणार; स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, अ‍ॅक्सिसचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:34 AM

नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला ११,५०० कोटी रुपयांचा चुना लावल्यानंतर सहा भारतीय बँकांपैकी तीन बँकांचा नफा घटणार आहे, तर तीन बँका तोट्यात जाणार आहेत. लोकमतने या सहा बँकांच्या ३१ मार्च २०१७ च्या नफा-तोटा पत्रकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.

- सोपान पांढरीपांडेनागपूर : नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला ११,५०० कोटी रुपयांचा चुना लावल्यानंतर सहा भारतीय बँकांपैकी तीन बँकांचा नफा घटणार आहे, तर तीन बँका तोट्यात जाणार आहेत. लोकमतने या सहा बँकांच्या ३१ मार्च २०१७ च्या नफा-तोटा पत्रकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.या घोटाळ्यात नीरव मोदींच्या तीन बेनामी कंपन्यांनी या बँकांच्या विदेशातील शाखांमधून घेतलेली कर्जे अशी, १) अलाहाबाद बँक २००० कोटी २) बँक आॅफ इंडिया २००० कोटी, ३) स्टेट बँक ९६० कोटी, ४) कॅनरा बँक १८०० कोटी, ५) युनियन बँक आॅफ इंडिया २३०० कोटी व ६) अ‍ॅक्सिस बँक २२०० कोटी, ही सर्व रक्कम पंजाब नॅशनल बँकेच्या विदेशातील नोस्त्रो खात्यातून या बँकांना एलओयूपोटी मिळाले आहेत.यामुळे स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, अ‍ॅक्सिसचा नफा घटणार असून, अन्य तीन बँका तोट्यात जाणार आहेत. लेटर आॅफ अंडरस्टँडिंग (एलओयू) हे एखाद्या कंपनीची भलावण करणारे ओळखपत्र असते तर लेटर आॅफ क्रेडिट (एलसी) हे बँकेने कंपनीच्या वतीने दिलेले हमीपत्र असते.5100कोटींचे गौडबंगालअंमलबजावणी संचालनालयाने नीरव मोदीच्या प्रतिष्ठानांवर छापे टाकून ५१०० कोटीची संपत्ती (हिरेजडीत दागिने) जप्त केली.या संपत्तीचे मूल्यांकन कुणी केले? व ते काही तासातच कसे पूर्ण झाले? हे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

टॅग्स :बँक