नवी दिल्ली : २0१९ पर्यंत दूरसंचार क्षेत्रात केवळ तीनच मोठ्या कंपन्या राहतील, असे प्रतिपादन भारती उद्योग समूहाचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांनी केले आहे.रिलायन्स जिओच्या आगमनानंतर दूरसंचार क्षेत्रात मोठ्या उलथापालथी होत आहेत. छोट्या कंपन्यांना अस्तित्व टिकविणे अवघड झाल्यानंतर अधिग्रहण आणि विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर मित्तल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, दूरसंचार क्षेत्रातील अस्थैर्य संपविणे हे नव्या कंपनीच्या (जिओ) हाती आहे. त्यांची बॅलन्सशीट मजबूत आहे. तथापि, आम्हीही आमचा अव्वल क्रमांक टिकवून ठेवण्याचा निर्धार केला आहे. कदाचित मार्च २0१८ पर्यंत अथवा खात्रीने म्हणाल तर मार्च २0१९ पर्यंत अस्थैर्य संपून तीनच आॅपरेटर बाजारात शिल्लक राहतील.मित्तल यांची भारती एअरटेल ही कंपनी सध्या भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी आहे. आयडिया आणि व्होडाफोन यांच्यात सध्या विलीनीकरण प्रक्रिया सुरू आहे. या विलीनीकरणानंत एअरटेलला आपले स्थान गमवावे लागेल का, या प्रश्नावर मित्तल यांनी म्हटले की, कदाचित गमवावे लागणार नाही.टाटाचा ४ टक्के आणि टेलिनॉरचा २.५ टक्के असा एकूण ६.५ टक्के बाजार हिस्सा होतो. त्यापैकी ३.५ टक्के हिस्सा जरी आम्ही टिकवू शकलो तरी आमची हिस्सेदारी ३७.५ टक्के होते. व्होडाफोन-आयडियाची हिस्सेदारी ४0 टक्के आहे. त्यांना १.५ टक्के हिस्सेदारी गमवावी लागेल.त्याचवेळी आम्ही १.५ टक्के हिस्सेदारी अतिरिक्त मिळवीत आहोत, असे सांगून मित्तल म्हणाले की, आम्ही बाजारात वाढ मिळवीत आहोत. सेवेचा दर्जा, विस्तार आणि ४ जी मधील गुंतवणूक याचा लाभ आम्हाला होईल.>बँक, म्युझिकचा फायदाआमची बँक आणि म्युझिक याचाही आम्हाला लाभ होईल. आम्ही नफ्याचे प्रमाण कमी केले आहे. आमचा महसूल कमी झाला आहे; पण छोटा महसूल हिस्सा गमावण्याच्या बदल्यात आम्ही मोठा बाजार हिस्सा मिळवीत आहोत. नऊ आॅपरेटरांचा महसूल विस्कळीत झाला आहे. आम्ही व्यवसायात मात्र सुधारणा करीत आहोत. या पार्श्वभूमीवर आम्ही आमचे पहिल्या क्रमांकावरील स्थान कायम राखू शकू, असे मला वाटते.
तीनच दूरसंचार कंपन्या टिकणार, एअरटेल राहील प्रथम क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 3:37 AM