Lokmat Money > बिझनेस न्यूज > तीन पट सॅलरी, टॅक्स फ्री इनकम...! भारतीयांच्या बळावर चालतो कुवेत, जाणून घ्या किती मिळतं वेतन?

तीन पट सॅलरी, टॅक्स फ्री इनकम...! भारतीयांच्या बळावर चालतो कुवेत, जाणून घ्या किती मिळतं वेतन?

Kuwait Fire: कुवेतमधील मंगफ (Kuwait Fire) येथे एक लेबर कॅम्प भारतीय मजुरांसाठी काळ ठरला. बुधवारी पहाटेच्या सुमारास या इमारतीला एवढी भीषण आग लागली की, या दुर्घटनेत 40 हून अधिक भारतीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही इमारत मल्याळी व्यापारी केजी अब्राहम यांच्या एनबीटीसी ग्रुपची होती. खरे तर, दरवर्षी हजारो भारतीय मजूर काम आणि चांगल्या वेतनाच्या अथवा पगाराच्या शोधात आखाती देशांमध्ये पोहोचतात. कारण तेथे छोट्या-छोट्या कामांसाठीही चांगले वेतन मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 10:33 AM2024-06-13T10:33:41+5:302024-06-13T10:36:05+5:30

Kuwait Fire: कुवेतमधील मंगफ (Kuwait Fire) येथे एक लेबर कॅम्प भारतीय मजुरांसाठी काळ ठरला. बुधवारी पहाटेच्या सुमारास या इमारतीला एवढी भीषण आग लागली की, या दुर्घटनेत 40 हून अधिक भारतीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही इमारत मल्याळी व्यापारी केजी अब्राहम यांच्या एनबीटीसी ग्रुपची होती. खरे तर, दरवर्षी हजारो भारतीय मजूर काम आणि चांगल्या वेतनाच्या अथवा पगाराच्या शोधात आखाती देशांमध्ये पोहोचतात. कारण तेथे छोट्या-छोट्या कामांसाठीही चांगले वेतन मिळते.

Three times salary tax free income Kuwait runs on the strength of Indians, know about how much salary get in kuwait | तीन पट सॅलरी, टॅक्स फ्री इनकम...! भारतीयांच्या बळावर चालतो कुवेत, जाणून घ्या किती मिळतं वेतन?

तीन पट सॅलरी, टॅक्स फ्री इनकम...! भारतीयांच्या बळावर चालतो कुवेत, जाणून घ्या किती मिळतं वेतन?

कुवेतमधील मंगफ (Kuwait Fire) येथे एक लेबर कॅम्प भारतीय मजुरांसाठी काळ ठरला. बुधवारी पहाटेच्या सुमारास या इमारतीला एवढी भीषण आग लागली की, या दुर्घटनेत 40 हून अधिक भारतीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही इमारत मल्याळी व्यापारी केजी अब्राहम यांच्या एनबीटीसी ग्रुपची होती. येथे कंपनीत काम करणाऱ्या मजुरांची व्यवस्था करण्यात आली होती.

खरे तर, दरवर्षी हजारो भारतीय मजूर काम आणि चांगल्या वेतनाच्या अथवा पगाराच्या शोधात आखाती देशांमध्ये पोहोचतात. कारण तेथे छोट्या-छोट्या कामांसाठीही चांगले वेतन मिळते. यातच, कुवेतसंदर्भात बोलायचे झाल्यास भारतीय मजूर म्हणजे, कुवेतचा कणा आहे.

कितनी मिलते सॅलर? - 
कुवेतमध्ये भारतीय मजुरांना चांगली मागणी आहे. भारतातील प्रोफेशनल आणि लेबर अशा दोघांनाही तेथे चांगली सॅलरी मिळते. हा पगार भारताच्या तुलनेत खूप अधिक आहे. मजुरीसंदर्भात बोलायचे झाल्यास, येथे कार धुणे, बांधकाम कामगार, शेती, मजूर, हेल्पर आदी कामांसाठी जवळपास १०० कुवेती दिनार, एवढा पगार मिळतो. भारतीय रुपयांमध्ये बोलायचे झाल्यास, जवळपास रु. २७२६६ (एक कुवैती दिनार = ₹२७२).

याशिवाय, गॅस कटर, लेथ मशीनवर काम करणारे मजून आदींची सॅलरी दरमहा 140 ते 170 कुवैती दिनारपर्यंत पोहोचते. एवढेच नाही, तर कतार आणि कुवेत सारख्या आखाती देशांमध्ये कुशल मजुरांचा सरासरी पगार 1260 कुवैती दिनार म्हणजेच जवळफास 3,43,324 रुपये प्रति महिना एवढा आहे. याशिवाय, भारतीय कामगारांना तेथे टॅक्स-फ्री इनकम, घरांवर मिळणारी सब्सिडी, कमी ब्याजदरात कर्ज, अशा अनेक सुविधाही मिळतात.

भारतात मिळणाऱ्या मजुरीच्या तुलनेत तीन पट अधिक -  
स्लॅबनुसार बगायच्या झाल्यास, कुवेतमध्ये लोअर ते मिड रेन्जच्या कामासाठी भारतीय प्रोफेशनल्सची सॅलरी 2.70 लाख ते 8 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच, हायली स्किल्ड एक्सपेरियन्स असलेल्यांची सॅलरी याहूनही अदिक असते. याच पद्धतीने अनस्किल्ड लेबरला 27 से 30 हजार रुपये, तर लोअर स्किल्ड लेबरला 38 हजार ते 46 हजार रुपयांपर्यंत मासिक सॅलरी मिळते. 

तर भारतामध्ये, अनस्किल्ड लेबरसाठी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी मजुरी आहे. आसाममध्ये 6600 आहे, तर बिहारमध्ये 10660 रुपये आहे. अर्थात कुवेतमध्ये मजुरांना भारताच्या तुलनेत तीनपट अधिक सॅलरी मिळते. यामुळेच भारतीय मजूर तेथे जातात. 

Web Title: Three times salary tax free income Kuwait runs on the strength of Indians, know about how much salary get in kuwait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.