Lokmat Money > बिझनेस न्यूज > तीन आठवड्यांतील सोन्याचा उच्चांक

तीन आठवड्यांतील सोन्याचा उच्चांक

जागतिक बाजारात मिळालेला उठाव आणि स्थानिक सराफांनी केलेली खरेदी यामुळे बुधवारी सोने आणखी ६० रुपयांनी वधारले.

By admin | Published: January 6, 2016 11:31 PM2016-01-06T23:31:46+5:302016-01-06T23:31:46+5:30

जागतिक बाजारात मिळालेला उठाव आणि स्थानिक सराफांनी केलेली खरेदी यामुळे बुधवारी सोने आणखी ६० रुपयांनी वधारले.

Three-week high gold | तीन आठवड्यांतील सोन्याचा उच्चांक

तीन आठवड्यांतील सोन्याचा उच्चांक

नवी दिल्ली : जागतिक बाजारात मिळालेला उठाव आणि स्थानिक सराफांनी केलेली खरेदी यामुळे बुधवारी सोने आणखी ६० रुपयांनी वधारले. परिणामत: सोन्याचा भाव २५,९०० रुपये प्रति १० ग्राम झाला. गेल्या तीन आठवड्यातील हा उच्चांकी स्तर आहे.
सोन्याप्रमाणेच चांदीही ५० रुपयांनी वधारून ३३,७५० रुपये प्रति किलो झाली. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह ही बँक वृद्धीची आकडेवारी जारी करणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जागतिक बाजारात सोन्याला उठाव होता. जागतिक बाजारात सिंगापूर येथे सोन्याचे भाव १०७७.२३ अमेरिकी डॉलर प्रति औंस, तर न्यूयॉर्क येथे १,०७९.४० अमेरिकी डॉलर प्रति औंस होते. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही शुद्धतेच्या सोन्याचे भाव ६० रुपयांनी वाढून अनुक्रमे २५,९०० आणि २५,७५० रुपये प्रति १० ग्रॅम झाले.

Web Title: Three-week high gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.