Join us  

तीन आठवड्यांतील सोन्याचा उच्चांक

By admin | Published: January 06, 2016 11:31 PM

जागतिक बाजारात मिळालेला उठाव आणि स्थानिक सराफांनी केलेली खरेदी यामुळे बुधवारी सोने आणखी ६० रुपयांनी वधारले.

नवी दिल्ली : जागतिक बाजारात मिळालेला उठाव आणि स्थानिक सराफांनी केलेली खरेदी यामुळे बुधवारी सोने आणखी ६० रुपयांनी वधारले. परिणामत: सोन्याचा भाव २५,९०० रुपये प्रति १० ग्राम झाला. गेल्या तीन आठवड्यातील हा उच्चांकी स्तर आहे.सोन्याप्रमाणेच चांदीही ५० रुपयांनी वधारून ३३,७५० रुपये प्रति किलो झाली. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह ही बँक वृद्धीची आकडेवारी जारी करणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जागतिक बाजारात सोन्याला उठाव होता. जागतिक बाजारात सिंगापूर येथे सोन्याचे भाव १०७७.२३ अमेरिकी डॉलर प्रति औंस, तर न्यूयॉर्क येथे १,०७९.४० अमेरिकी डॉलर प्रति औंस होते. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही शुद्धतेच्या सोन्याचे भाव ६० रुपयांनी वाढून अनुक्रमे २५,९०० आणि २५,७५० रुपये प्रति १० ग्रॅम झाले.