Join us

प्ले स्टोअरवरुन Tiktok अ‍ॅप गायब, पण, कोट्यवधींच्या मोबाईलमध्ये अद्यापही सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 10:57 AM

देशातील लडाखच्या भूसीमेवर डोळे वटारून पाहणाऱ्या चीनशी समर्थपणे दोन हात करत असतानाच केंद्र सरकारने 59 चायना अॅप बंदीचा निर्णय घेतला

नवी दिल्ली : भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता यांना धोका ठरू शकणाऱ्या ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी रात्री जाहीर केला. त्यामध्ये भारतातील लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप असलेल्या टीकटॉकचाही समावेश आहे. टीकटॉक बंद झाल्याने टीकटॉक स्टार आणि टीकटॉकद्वारे मनोरंजन करणारे युजर्सं निराश झाले आहेत. त्यातच, आता प्ले स्टोअरवरुन हे अ‍ॅप काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे, आता नव्याने टीकटॉक इन्स्टॉल होऊ शकणार नाही. मात्र, ज्या कोट्यवधी युजर्संने हे अ‍ॅप डाऊनडोल केले आहे, त्यांच्या मोबाईलमध्ये हे कार्यरत असल्याचे दिसून येते.  

देशातील लडाखच्या भूसीमेवर डोळे वटारून पाहणाऱ्या चीनशी समर्थपणे दोन हात करत असतानाच केंद्र सरकारने 59 चायना अॅप बंदीचा निर्णय घेऊन सीमांचे बंधन नसलेल्या सायबर विश्वातही या कपटी शेजारी देशाविरुद्ध भारताने एक प्रकारे युद्धाचे बिगुल फुंकले आहे. बाजारात कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जाणाºया चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये यापैकी बरीच लोकप्रिय अ‍ॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अ‍ॅप्सचा वापर करण्यासही बंदी घातली आहे.

केंद्र सरकारने सोमवारी रात्री टीकटॉकसह 59 अ‍ॅपवर बंदी घातल्याच्या निर्णयाची घोषणा केली. त्यानंतर, टीकटॉक युजर्संने आपल्या अॅपवर जाऊन प्रोफाईल पाहिले, अ‍ॅप सुरु आहे की नाही, याचीही खात्री केली. तर, प्ले स्टोअरवरही हे अ‍ॅप उपलब्ध होते. मात्र, सकाळी 9 वाजल्यापासून पाहिल्यानंतर प्ले स्टोअरवर टीकटॉक अ‍ॅप उपलब्ध नसल्याचे दिसते. प्ले स्टोअरवर टीकटॉक टाईप केल्यानंतर, संबंधित इतर अ‍ॅप दिसून येतात. मात्र, सोशल मीडियावरील लोकप्रिय टीकटॉक अ‍ॅप दिसून येत नाही.  प्ले स्टोअरवरुन अखेर हे अ‍ॅप बंद करण्यात आले आहे. तरी, ज्या युजर्संने यापूर्वी ते अ‍ॅप डाऊनलोड केले आहे, ते युजर्स सध्या अ‍ॅपचा वापर करत असून या कंपन्यातील कर्मचाऱ्यांचे डेली वर्क नेहमीप्रमाणे सुरु आहे. 

दरम्यान, या अ‍ॅप्समुळे खासगी डेटा व खासगीपण यांच्यावर आक्रमण होत असल्याच्या तक्रारी आहेत. या अ‍ॅप्सना मिळणारी माहिती भारताचे सार्वभौमत्व आणि ऐक्य यांच्या विरोधात वापरली जात असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीचा वापर देशाची सुरक्षा व सुव्यवस्था यांच्या विरोधात होत आहे. 

टॅग्स :टिक-टॉकसरकारचीन