Lokmat Money > बिझनेस न्यूज > समीर जोशीच्या जामिनावर म्हणणे मांडण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदत

समीर जोशीच्या जामिनावर म्हणणे मांडण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदत

By admin | Published: September 30, 2014 09:38 PM2014-09-30T21:38:53+5:302014-09-30T21:38:53+5:30

Till the 7th of October to show Samir Joshi's bail | समीर जोशीच्या जामिनावर म्हणणे मांडण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदत

समीर जोशीच्या जामिनावर म्हणणे मांडण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदत

>नागपूर : शेकडो गुंतवणूकदारांच्या घामाचा पैसा हडपणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशीने अमरावती व अकोला येथील प्रकरणात जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने मंगळवारी त्यावर म्हणणे मांडण्यासाठी सरकारला शेवटची संधी म्हणून ७ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.
समीर व त्याची पत्नी पल्लवी प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. उच्च न्यायालयाने पल्लवीला जामीन दिला आहे. समीर ११ महिन्यांपासून कारागृहात आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी त्याला कमाल सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.
अनेक कंपन्या नुकसानीत सुरू असतानाही प्रलोभन दाखवून त्याने शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना फसविले. (प्रतिनिधी)

Web Title: Till the 7th of October to show Samir Joshi's bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.