Lokmat Money > बिझनेस न्यूज > फेब्रुवारीपर्यंत देशातील वित्तीय तूट ७६ टक्के

फेब्रुवारीपर्यंत देशातील वित्तीय तूट ७६ टक्के

२०२०-२१ या आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारी या ११ महिन्यांच्या कालावधीत केंद्र सरकारची वित्तीय तूट सुधारित अंदाजाच्या तुलनेत ७६ टक्के राहिली. याचाच अर्थ या वर्षातील वित्तीय तूट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्धारित केलेल्या उद्दिष्टाच्या आतच राहील. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 04:07 AM2021-04-02T04:07:24+5:302021-04-02T04:07:55+5:30

२०२०-२१ या आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारी या ११ महिन्यांच्या कालावधीत केंद्र सरकारची वित्तीय तूट सुधारित अंदाजाच्या तुलनेत ७६ टक्के राहिली. याचाच अर्थ या वर्षातील वित्तीय तूट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्धारित केलेल्या उद्दिष्टाच्या आतच राहील. 

Till February, the country's fiscal deficit is 76 per cent | फेब्रुवारीपर्यंत देशातील वित्तीय तूट ७६ टक्के

फेब्रुवारीपर्यंत देशातील वित्तीय तूट ७६ टक्के

नवी दिल्ली : २०२०-२१ या आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारी या ११ महिन्यांच्या कालावधीत केंद्र सरकारची वित्तीय तूट सुधारित अंदाजाच्या तुलनेत ७६ टक्के राहिली. याचाच अर्थ या वर्षातील वित्तीय तूट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्धारित केलेल्या उद्दिष्टाच्या आतच राहील. 
यंदा फेब्रुवारीत अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्र्यांनी २०२०-२१ साठी वित्तीय तूट १८.१८ लाख कोटी रुपये अथवा जीडीपीच्या ९.५ टक्के राहण्याचा सुधारित अंदाज व्यक्त केला होता. मूळ अर्थसंकल्पात वित्तीय तूट ७.९६ लाख कोटी अथवा ३.५ टक्के अनुमानित करण्यात आली होती. तथापि, नंतर उद्भवलेल्या कोविड-१९ साथीमुळे सरकारचा खर्च वाढला आणि त्याचवेळी महसुलात घट झाली. त्यामुळे तूट वाढली आहे.
महालेखा नियंत्रक (सीजीए) यांच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत वित्तीय तूट १४.०५ लाख कोटी रुपये अथवा सुधारित अनुमानाच्या ७६ टक्के राहिली. 

Web Title: Till February, the country's fiscal deficit is 76 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.