नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एकट्या वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आपली मालमत्ता यावर्षीही जाहीर केली आहे. मंत्र्यांचे सार्वजनिक जीवन पारदर्शी असावे यासाठी प्रत्येक मंत्र्याने दरवर्षी स्वत:च्या, पत्नी/पतीच्या व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या संपत्तीचा तपशील द्यायचा व तो पंतप्रधान कार्यालयाने जनतेसाठी उपलब्ध करायचा अशी प्रथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. त्यानुसार यंदा केवळ अरुण जेटली यांनीच मालमत्तेची ही माहिती दिली आहे. त्यामुळे इतर मंत्री आपली संपत्ती कधी जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अरुण जेटली यांच्यामुळे आपोआपच इतर मंत्र्यांवर संपत्ती व मालमत्ता जाहीर करण्यासाठी दबाव येणार आहे. अर्थात गेल्या वर्षीही जेटली यांनी स्वत:हून मालमत्ता जाहीर केली होती. मात्र केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी, राजीव प्रताप रुडी, सर्वानंद सोनवाल, बाबुल सुप्रियो, राज्यवर्धन राठोड अशा १३ केंद्रीय मंत्र्यांनी गेल्या वर्षीही आपल्या संपत्तीची माहिती दिली नव्हती. त्यामुळे यंदा त्यांच्यावर दबाव आणला जाणार का किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना तशा सूचना जाणार का, हे पाहणे गरजेच आहे. जेटली यांच्या मालमत्तेमध्ये मार्च २०१६ अखेर त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत सुमारे सहा कोटी रुपयांची घट झाली आहे.उपलब्ध माहितीनुसार, वर्ष २०१५-१६ अखेरीस जेटली व त्यांची पत्नी संगीता यांच्या नावे एकूण ६०.९९ कोटी रुपयांची स्थावर-जंगम मालमत्ता होती. त्याआधीच्या म्हणजे २०१४-१५ या वर्षात जेटली दाम्पत्याची मालमत्ता ६७.०१ कोटी रुपये होती. म्हणजेच वर्षभरात त्यांच्या मालमत्तेत ८.९ टक्क्यांनी (सुमारे सहा कोटी रु.) घट झाली. या माहितीनुसार जेटलींच्या निवासी व व्यापारी मालमत्तांच्या बाजारमूल्यात फरक पडलेला नाही. मात्र जी घट झाली आहे ती प्रामुख्याने त्यांच्या बँक खात्यांतील ठेवी, रोकड व मोटारींमध्ये झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)माहिती देणारे जेटली एकमेवमंत्र्यांचे सार्वजनिक जीवन पारदर्शी असावे यासाठी प्रत्येक मंत्र्याने दरवर्षी स्वत:च्या, पत्नी/पतीच्या व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या संपत्तीचा तपशील द्यायचा व तो पंतप्रधान कार्यालयाने जनतेसाठी उपलब्ध करायचा अशी प्रथा मोदींनी सुरू केली. यंदाच्या वर्षी मालमत्तांचा ताजा तपशील देणारे जेटली हे एकमेव मंत्री आहेत. गेल्या वर्षी राजनाथ सिंग, मनेका गांधी, राज्यवर्धन सिंह राठोड, बाबुल सुप्रियो, राजीव प्रताप रुडी व सर्वानंद सोनोवाल यांच्यासह एकूण १३ केंद्रीय मंत्र्यांच्या मालमत्तांचा तपशील जाहीर केला गेला नव्हता.जेटलींच्या मालमत्तांचा ठळक तपशील(कंसातील आकडे आधीच्या वर्षाचे) - चार बँक खात्यांमधील मिळून रक्कम एक कोटी रु. (३.५२ कोटी रु.) दोन खासगी कंपन्यांमध्ये ठेवलेल्या ठेवी १७ कोटी रु. (१७ कोटी रु.) हातातील रोकड ६५.२९ लाख रु. (९५.३ लाख रु.), पीपीएफमधील रक्कम २५.६९ लाख रु. (२२.१८ लाख रु.) इतरांना कर्जाऊ दिलेली रक्कम ९,३४ कोटी रु. (९.१ कोटी रु.) नव्या मालमत्तांच्या खरेदीसाठी बयाणा म्हणून दिलेली रक्कम ७५.६ लाख रु. (७५ लाख रु.)
यंदा एकट्या अरुण जेटली यांनीच केली मालमत्ता जाहीर
By admin | Published: July 03, 2016 1:15 AM