लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : चालू वित्त वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत भारताच्या अर्थव्यवस्थेला जबर झटका बसला असून सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धीदर घसरून ४.४ टक्के झाला आहे. अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ५ टक्क्यांच्या खाली येणे हा चिंतेचा विषय आहे.
मंगळवारी सरकारच्या वतीने जीडीपीच्या वृद्धीदराचे आकडे जाहीर करण्यात आले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या गतीला जबर ब्रेक लागल्याचे या त्यातून दिसून येत आहे. जीडीपीचा वृद्धीदर २०२१-२२ च्या तिसऱ्या तिमाहीत तो ५.२ टक्के होता.
सरकारने वित्त वर्ष २०२२-२३ साठी वृद्धीदर अंदाज ७ टक्के कायम ठेवला आहे. जीव्हीए वृद्धीचा अंदाज मात्र ६.७ टक्क्यांवरून कमी करून ६.६ टक्के केला आहे. तिसऱ्या तिमाहीतील जीव्हीए ४.६ टक्के राहिला. गेल्या वर्षी तो ४.७ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने
(एनएसओ) वित्त वर्ष २०२१-२२ चा वृद्धीदर सुधारून ८.७ टक्क्यांवर ९.१ टक्के केला आहे.
यंदा असा राहिला जीडीपी
एप्रिल-जून १३.५
जुलै-सप्टेंबर ६.३
ऑक्टाेबर-डिसेंबर ४.४