नवी दिल्ली : इंटरनेट कंपनी ‘गुगल’शी संबंधित प्रकरणी अंतिम निर्णय घेण्यास आणखी वेळ लागू शकेल, असे भारतीय प्रतिस्पर्धी आयोगाने (सीसीआय) स्पष्ट केले आहे.
गुगलचे हे प्रकरण कथितरीत्या गैरप्रतिस्पर्धा व्यवहार केल्याशी निगडित आहे. आयोगाच्या तपास शाखेने आपला अहवाल आयोगाला सोपविला आहे. गुगल प्रकरणाची स्थिती आणि त्याबाबत वर्तविण्यात येत असलेल्या अंदाजाबाबत विचारले असता आयोगाचे चेअरमन अशोक चावला म्हणाले की, या प्रकरणी कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी आणखी वेळ लागेल.
येथे एका कार्यक्रमप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, या बहुचर्चित हायप्रोफाईल प्रकरणी नेहमीच अंदाज बांधण्यात येत असतात. या प्रकरणी प्रतिस्पर्धा कायद्याच्या प्रक्रियेतून जावे लागेल. संबंधित पक्षांची बाजू ऐकून घ्यावी लागेल. त्यानंतरच आयोग निर्णय घेईल. तपास अहवाल संबंधित पक्षांना पाठविण्यात आला असून, त्यांच्या टिपणांची प्रतीक्षा आहे. त्यांच्याकडून टिपण आल्यानंतर सर्व प्रकरण महासंचालकांकडे पाठविले जाईल. हवाई तिकिटांचे दर निश्चितच करण्याच्या प्रकरणात कथितरीत्या गैरप्रकार केल्याच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विमान क्षेत्रात कंपन्या कमी आहेत. त्यामुळे त्यांचे भाडे नेहमी कमी-जास्त होते; पण या प्रकरणातही गैरप्रकारचा पुरावा मिळालेला नाही.
‘गुगल’च्या निर्णयास अवधी
इंटरनेट कंपनी ‘गुगल’शी संबंधित प्रकरणी अंतिम निर्णय घेण्यास आणखी वेळ लागू शकेल, असे भारतीय प्रतिस्पर्धी आयोगाने (सीसीआय) स्पष्ट केले आहे.
By admin | Published: September 23, 2015 10:10 PM2015-09-23T22:10:50+5:302015-09-23T22:10:50+5:30