टाइम मासिकाने (Time Magazine) जगातील १०० प्रभावशाली कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत दोन भारतीय कंपन्यांनीही आपले स्थान निर्माण केले आहे. जगातील प्रभावशाली कंपन्यांमध्ये OpenAI, SpaceX, Chess.com आणि Google DeepMind या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. भारताच्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सोबत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशोलाही या यादीत स्थान देण्यात आले आहे. टाईमने बुधवारी या वर्षातील १०० सर्वात प्रभावशाली कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. ही यादी ५ श्रेणींमध्ये विभागली आहे. यामध्ये लीडर्स, डिसप्टर्स, इनोव्हेटर्स, टायटन्स आणि पायोनियर्स यांचा समावेश आहे. यामध्ये प्रत्येक श्रेणी अंतर्गत २० कंपन्या लिस्टेड केल्या आहेत. यावर्षी दोन भारतीय कंपन्यांनी या यादीत स्थान मिळवले आहे.
एका वर्षात गुंतवणूक दुप्पट, १० स्मॉल कॅप शेअर बदलू शकतात तुमचं नशीब; व्हाल श्रीमंत
टाईमने यात सांगितले की, ते सर्व क्षेत्रांतून नामांकने मागत आहेत. यामध्ये जागतिक नेटवर्कसोबतच बाह्य तज्ज्ञांकडूनही सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर प्रत्येक कंपनीचे मूल्यमापन प्रभाव, नवकल्पना, महत्त्वाकांक्षा आणि यश यासह प्रमुख घटक विचारात घेतले जातात. त्याआधारे यादी तयार केली आहे.
अमेरिकन सोशलाईट किम कार्दशियनचा कपड्यांचा ब्रँड स्किम्स, सॅम ऑल्टमॅनचा ओपनएआय, फुटवेअर निर्माता क्रॉक्स, इलॉन मस्क यांचा स्पेसएक्स, भाषा शिक्षण अॅप ड्युओलिंगो, कॅनव्हा, डिस्कॉर्ड, डिस्ने आणि आयबीएम या यादीत आहेत.
मीशो
टाईमनुसार, बंगळुरूस्थित मीशो हे २०२२ च्या सुरुवातीला जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेले शॉपिंग अॅप आहे. हे अॅमेझॉन आणि वॉलमार्टने ठरवलेल्या किमतीत ग्राहकांना सेवा पुरवते. त्यांच्या स्पर्धकांच्या विपरीत, मीशो विक्रेत्यांकडून कोणतेही कमिशन घेत नाही.
एनपीसीआय
भारतात स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर वाढला आहे. NPCI ने युनायटेड पेमेंट्स इंटरफेस (UPI) लाँच केले आहे. हे मोबाइल अॅप आणि QR कोडद्वारे त्वरित पैसे हस्तांतरण सक्षम करते. डेबिट आणि क्रेडिट कार्डे बदलून सुमारे ३०० मिलियन वापरकर्त्यांपर्यंत डिजिटल पेमेंट आणले आहे.