Join us  

insurance: लाइफ इन्शुरन्स घ्यावा की नको? संकटकाळात कुटुंबाचे भविष्य हाेते सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 10:17 AM

insurance: भारतात सध्या विमा घेण्याचे प्रमाण वाढले असले तरी ते इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. जीवन विमा अर्थात लाइफ इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाचा असला तरीही अनेक लोक तो घेण्याकडे कानाडोळा करतात.

मुंबई : भारतात सध्या विमा घेण्याचे प्रमाण वाढले असले तरी ते इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. जीवन विमा अर्थात लाइफ इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाचा असला तरीही अनेक लोक तो घेण्याकडे कानाडोळा करतात. यामुळे आपल्या मृत्यूपश्चात कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. लोकांना लाइफ इन्शुरन्स घेताना भारतीयांना नेमके काय वाटते, ते जाणून घेऊ...विमा कसा घेतात? ६० टक्के लोक विमा पॉलिसी ऑफलाइन घेण्यास प्राधान्य देतात.  १८ ते २६ वयोगटातील ३२ टक्के जण अभ्यास करून ऑनलाइन पॉलिसी घेण्यास प्राधान्य देतात.  हेच प्रमाण ४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्यांमध्ये २६ टक्के इतके आहे. ऑफलाइन विमा खरेदी करताना एजंट किंवा बँक शाखेची मदत घेतल्याने अधिक चांगले उत्पादन घेतले जाते, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांनी सांगितले.

लोक विमा का घेत नाहीत? पुरेसे पैसे नसल्याने तब्बल ४४ टक्के लोक लाइफ इन्शुरन्स घेण्यास टाळाटाळ करतात. ४४ टक्के जणांना जीवन विम्याबद्दल पुरेशी माहितीच नसल्याने विमा घेतला नसल्याचे सर्वेक्षणात सांगितले. महिलांच्या तुलनेत ४८ टक्के पुरुषांकडे पुरेसा निधी नसतो तर जीवन विम्याचा प्रीमियर खूप महागडा असल्याचे १८ टक्के महिलांचे मत आहे.

१० पैकी ९ जण म्हणतात की, भविष्यातील सुरक्षेसाठी जीवन विमा खरेदी करणे आवश्यक आहे.

४५ पेक्षा अधिक वयोगटातील ३९ टक्के जणांना जीवन विम्यात निवृत्तीनंतर एकरकमी किंवा नियमित पैसे मिळण्याचा पर्याय हवा आहे.५०%+ जणांना जीवन विम्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक व कर नियोजनासाठी अतिशय महत्त्वाची वाटते.

४२%लोकांना जीवन विम्यातून अधिक रिटर्न हवे आहेत.

४०%लोकांना विम्याचा प्रीमियम हा परवडणारा हवा.

४३%दक्षिण भारतात लोकांना जीवन विम्यातून गॅरन्टीड परतावा हवा आहे.

३८%जणांना क्लेम केल्यानंतर तो वेळेत आणि त्रास न होता मिळावा, अशी अपेक्षा आहे.

आरोग्य आणि जीवन विमा या प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय गरजेच्या योजना आहेत. त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती नुकसान भरून काढू शकतात. अचानक मृत्यू आल्यास किंवा आजारपणात आपल्या प्रियजनांचे संरक्षण यामुळे करता येते.

लोकांना काय हवे? n १० पैकी ४ लोकांना जीवन विम्याचा प्रीमियम परवडणारा आणि अधिक रिटर्न देणारा हवा आहे. n २१ टक्के लोकांना कंपनीकडून उत्तम ग्राहक सेवा मिळावी, अशी अपेक्षा आहे. n ३५ टक्के लोकांना लाइफ इन्शुरन्स नेमका कसा, त्यातील प्रकार काय आणि नेमका कोणता, हे समजणे कठीण वाटते. 

किती विश्वास?  n ८३% लोकांना जीवन विमा म्हणजे त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करतो, असा विश्वास वाटतो. n याचवेळी १८ ते २६ वर्षे वयोगटातील १० पैकी ४ जण विमा कंपन्यांवरील विश्वास, पारदर्शकता व बांधिलकी कमी असल्याचे म्हणतात. n पूर्व भारतातील ७१% लोक विमा कंपन्यांचा विश्वास आणि पारदर्शक प्रक्रियेला महत्त्व देतात.

आर्थिक ध्येय पूर्ण करतो?n ८० टक्के जण म्हणतात की, सध्याच्या बचतीमुळे मुलाच्या शिक्षणासाठी मदत होऊ शकते. n ४५ पेक्षा अधिक वयातील व्यक्ती मुलाच्या शिक्षणासाठी रोजची बचत पुरेशी नाही, असे म्हणतात. ६१ टक्के जण म्हणतात की, लाइफ इन्शुरन्स असतानाही कर्ज घेण्यास अडचण येत नाही. n ७० टक्के जण म्हणतात की, वैद्यकीय आणीबाणी आणि मुलाचे शिक्षण यासाठी जीवन विमा अतिशय महत्त्वाचा आहे. 

टॅग्स :गुंतवणूक