Lokmat Money > बिझनेस न्यूज > महात्मा फुले महामंडळ कोणाला अर्थसाह्य करते? जाणून घ्या, योजनांबद्द्ल सविस्तर...

महात्मा फुले महामंडळ कोणाला अर्थसाह्य करते? जाणून घ्या, योजनांबद्द्ल सविस्तर...

Mahatma Phule Mahamandal : महामंडळाचे सध्याचे अधिकृत भाग भांडवल एक हजार कोटी आहे. राज्य व केंद्र शासन यांचेकडून भाग भांडवल प्रात्पीचे प्रमाण अनुक्रमे ५१:४१ असे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 04:46 PM2022-07-06T16:46:06+5:302022-07-06T16:46:55+5:30

Mahatma Phule Mahamandal : महामंडळाचे सध्याचे अधिकृत भाग भांडवल एक हजार कोटी आहे. राज्य व केंद्र शासन यांचेकडून भाग भांडवल प्रात्पीचे प्रमाण अनुक्रमे ५१:४१ असे आहे.

To whom does Mahatma Phule Mahamandal finance? Find out in detail about the plans .... | महात्मा फुले महामंडळ कोणाला अर्थसाह्य करते? जाणून घ्या, योजनांबद्द्ल सविस्तर...

महात्मा फुले महामंडळ कोणाला अर्थसाह्य करते? जाणून घ्या, योजनांबद्द्ल सविस्तर...

- योगेश बिडवई

मागास वर्ग घटकांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना ४० वर्षांपासून राबविल्या जात आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध, तसेच सफाई कर्मचारी आदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाची आर्थिक उन्नती जलद गतीने घडवून आणण्याच्या मुख्य उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची १० जुलै १९७८ रोजी स्थापना केली आहे. महामंडळाचे सध्याचे अधिकृत भाग भांडवल एक हजार कोटी आहे. राज्य व केंद्र शासन यांचेकडून भाग भांडवल प्रात्पीचे प्रमाण अनुक्रमे ५१:४१ असे आहे.

महामंडळाच्या सध्या कार्यन्वित योजनांसह नवीन योजनांची अंमलबजावणी झाल्यास कमकुवत घटकांचा विकास होण्यास मदत होईल. रोजगार निर्मितीमुळे कमकुवत घटनांमध्ये आत्मनिर्भरता आणि अभिमानाची भावना निर्माण होईल. मध्यमवर्गीयांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. सामाजिक न्याय व सबलीकरण हे घटनात्मक समतेचे अनुकरणीय मॉडेल बनू शकेल.

३० लाखांपर्यंतचे साह्य
महामंडळामार्फत ५० हजारांपासून ३० लाखांपर्यंतच्या स्वंयरोजगार व प्रशिक्षणाच्या योजना अनुसूचित जाती, नवबौद्ध व सफाई कर्मचारी यांच्यासाठी राबविण्यात येत आहेत.

राज्यात ४२ कार्यालये
- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची ४२ कार्यालये राज्यात कार्यरत आहेत. १ मुख्य कार्यालय, ६ प्रादेशिक कार्यालय व ३६ जिल्हा कार्यालयांचा समावेश आहे. जिल्ह्यांतर्गत जनजागृती शिबीर मेळावे कार्यक्रम होतात.

अर्जदाराची काय असावी पात्रता?
-  अनुसूचित जाती, नवबौध्य संवर्ग
- वय १८ ते ५०
-  राज्य व केंद्रीय महामंडळाच्या योजनांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ३ लाख
- एनएसकेएफडीसी योजनेंतर्गत अर्जदाराने सफाई कामगार कुटुंबातील असल्याचा दाखला देणे अनिवार्य आहे. या योजनेंतर्गत अर्ज करण्याकरिता जातीची व उत्पन्नाची अट नाही. 
-  अर्जदार महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा (राज्य/केंद्र) थकबाकीदार नसावा.

राष्ट्रीय पातळीवरील योजना
राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली (एनएसएफडीसी) व राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली (एनएसकेएफडीसी) यांच्या योजनादेखील राबविण्यात येतात.
- मुदत कर्ज
- सुक्ष्मपत पुरवठा
- महिला समृद्धी
- उच्च शैक्षणिक कर्ज
- प्रशिक्षण

संपर्क कसा करायचा?
योजनांच्या माहितीसाठी महामंडळाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२१९७८ तसेच महामंडळाची वेबसाईट www.mpbcdc.maharashtra.gov.in वर संपर्क साधावा.

या आहेत योजना?
- अनुदान योजना
- बीज भांडवल योजना
- थेट कर्ज योजना
- प्रशिक्षण योजना

Web Title: To whom does Mahatma Phule Mahamandal finance? Find out in detail about the plans ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.