गुवाहाटी : तंबाखू सेवन किंवा धूम्रपानामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत सातत्याने जगजागरण केले जाते, हे खरे असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेत मात्र तंबाखूच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भारतीय अर्थव्यवस्थेत ११, ७९,४९८ कोटींचे योगदान देणाºया तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनामुळे ४ कोटी ५७ लाख लोकांचा उदरनिर्वाही चालत आहे. असोचेमच्या वतीने चिंतन मूल्यांतरपणन संशोधन संस्थेने (टीएआरआय) केलेल्या ताज्या अध्ययनातून तंखाबूचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित झाले आहे.
तंबाखूची लागवड करणारे शेतकरी, कर्मचारी, मजूर, प्रक्रिया उद्योग, वाहतूक, व्यापार साखळी, उत्पादक कंपन्या तसेच निर्यात व्यापारापर्यंत या क्षेत्राची व्याप्ती आहे. या उद्योगावर ज्यांची रोजीरोटी चालते त्यात २ कोटी शेत मजूर, ४ कोटी पाने खुडणारे मजूर, प्रक्रिया, उत्पादन आणि निर्यात उद्योगातील ८ कोटी कामगार आणि किरकोळ व्यवसाय आणि व्यापार क्षेत्रातील ७.२ कोटी कामगारांचा समावेश आहे.
निर्यातीतही मोठा वाटाभारत हा तंबाखूचा अग्रणी निर्यातदार आहे. एकूण निर्यात व्यापारापैकी अनुत्पादक तंबाखूचा वाटा ४,१७३ कोटी आहे. तर १,८३० कोटींची कमाईल सिगार, चिरुट, सिगारेट यांच्या निर्यातीतून होते. तंबाखूच्या पानांच्या जागतिक निर्यात व्यापारात भारताचा वाटा ५ टक्के आहे. या अहवालातून पहिल्यांदाच भारतीय अर्थव्यवस्थेतील तंबाखूच्या योगदानाचे आर्थिकदृष्ट्या मूल्यमापन केले आहे, असे टीएआरआयच्या संचालक क्षमा व्ही. कौशिक यांनी सांगितले.