आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठा बदल दिसून आला. आज सोने सोमवारच्या बंद झालेल्या 59921 रुपये किंमतीच्या तुलनेत 149 रुपयांनी स्वस्त होऊन 59772 रुपये प्रती 10 ग्रॅमवर खुले झाले. याच बरोबर, आज चांदीच्या दरात 330 रुपयांची घसरण दिसून आली आहे. आज चांदी 73102 रुपये प्रति किलो वर खुली झाली.
आचा सोने आपल्या ऑल टाइम हाय पेक्षा 1967 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त मिळत आहे. गेल्या 5 मे रोजी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या स्पॉट प्राईसने 61,739 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. तसेच याच दिवशी चांदीही 77280 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. या दिवशीच्या दराच्या तुलनेत आता चांदी जवळपास 4000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) जारीकेलेल्या दरांनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर 54751 रुपये, तर 23 कॅरेट सोन्याचा दर 59533 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. याच बरोबर, आता 14 कॅरेट सोन्याचा दर 34967 रुपये, तर 18 कॅरेट सोन्याचा दर 44829 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्या-चांदीच्या या दरावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्ज लावण्यात आलेला नाही.
'24 कॅरेट गोल्ड असते सर्वात शुद्ध -खरे तर 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते. शुद्ध सोने अथवा 24 कॅरेट सोने हे 99.9 टक्के शुद्धत असते. त्यात इतर कुठलाही धातू मिसळलेला नसतो. सोन्याची नाणी आणि बार तयार करण्यासाठी 24 कॅरेट सोन्याचा वापर होतो. सोन्याची शुद्धता ही 24 कॅरेटच्या तुलनेत मोजली जाते.
लक्षात असू द्या ही महत्वाची गोष्ट - जर आपण सोनं खरेदीसाठी बाजारात जात असाल तर हॉलमार्क बघूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी आपण सरकारी अॅपचाही वापर करू शकता. ‘BIS Care app’ च्या माध्यमाने आपण सोन्याची शुद्धता चेक करू शकता. याशिवाय याच अॅपच्या माध्यमाने आपण तक्रारही करू शकता.