Join us

Today Gold Price: नव्या वर्षात सोने महागले! पाच दिवसात ७५८ रुपयांनी वाढले, आजचे दर काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 12:46 PM

नव्या वर्षात भारतीय वायदा बाजारमध्ये सोनं पुन्हा महागले आहे, तर दुसरीकडे चांदीच्या दरात घट झाली. या महिन्यात आता सोन्याचे भाव ७५८ रुपयांनी वाढले आहेत.

नव्या वर्षात भारतीय वायदा बाजारमध्ये सोनं पुन्हा महागले आहे, तर दुसरीकडे चांदीच्या दरात घट झाली. या महिन्यात आता सोन्याचे भाव ७५८ रुपयांनी वाढले आहेत. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर ०.१९ टक्क्यांच्या व्यवहारावर आहे. चांदीचा दर आज ०.८ टक्क्यांनी घटले आहेत. चांदी आज ७० हजार रुपये प्रतिकिलो आहे. मागील व्यवहारात एमसीएक्सवर सोन्याचे भाव ०.४८ टक्क्यांनी तेजीवर बंद झाला होता. (Today Gold Price) चांदीचे दर ०.८८ टक्क्यांनी बंद झाला होता. 

गुरुवारी, फ्युचर्स मार्केटमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर कालच्या बंद किमतीपासून सकाळी ९:२५ पर्यंत १०८ रुपयांनी वाढून ५५,८७५ रुपये प्रति १० ग्रॅम होता. आज सोन्याचा भाव 55,794 रुपये झाला. ही किंमत 55,920 रुपयांवर गेली. पण, नंतर कमी झाली. गेल्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर सोन्याचा भाव २६९ रुपयांनी वाढून ५५,७९९ रुपयांवर बंद झाला.

चांदीच्या दरात आज घट झाली आहे. आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा दर आज ५३ रुपयांनी घसरून ६९,२६५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. चांदीचा दर आज ६९,३३० रुपयांवर आहे. काल चांदीची किंमत ६८,१८० रुपयांवर होता. (Today Gold Price) पण, काही वेळानंतर तो ६९,३३० रुपये झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर चांदीचे दर ६७० रुपयांनी घसरून ६९,३०० रुपयांवर बंद झाला.

जर तुमची कंपनी दिवाळखोरीत गेली, तर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळते का? काय सांगतो अधिकार

नव्या वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात सोने महागले आहे. पण, चांदीचे दर घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज (Today Gold Price)  सोन्याचा दर वाढला असला तरी चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची किंमत आज १.०४ टक्क्यांनी वाढून १,८५६.१४ डॉलर प्रति औंस झाली आहे.तर चांदी ०.९२ टक्क्यांनी घसरून २३.७५ डॉलर प्रति औंस झाली आहे.

टॅग्स :सोनंचांदी