नवी दिल्ली : सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोना वायदा 0.3% घसरून 52,712 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. तर चांदी 0.6 टक्के घसरून 69970 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. दरम्यान, विशेष म्हणजे, सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात तेजी पाहायला मिळाली होती. ऑगस्ट 2022 नंतर सर्वोच्च पातळीवर 56,200 रुपयाच्या जवळ 55,558 रुपयांवर पोहोचले होते.
सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान जागतिक बाजारपेठेत मोठा परिणाम दिसून येत आहे. अनेक देशांची आर्थिक स्थिती खालावली आहे. जर आपण जागतिक बाजारांवर नजर टाकली तर, आज सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत, कारण दर वाढीच्या अपेक्षेमुळे यूएस ट्रेझरी उत्पन्नात वाढ झाली आहे. दुसरीकडे, आज युक्रेन आणि रशियामधील संघर्ष संपवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे.
सोन्याची आयात वाढली
भारतात सोन्याच्या आयातीमुळे चालू आर्थिक वर्षात 11 महिन्यात म्हणजे एप्रिल - फेब्रुवारीमध्ये 73 टक्के वाढले असून 45.1 अरब डॉलरपर्यंत पोहोचले आहे. मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात 26.11 अब्ज डॉलर होती.
3 टक्के जीएसटी स्वतंत्रपणे
दरम्यान, www.ibjarates.com वर सकाळी आणि संध्याकाळी सोन्या-चांदीच्या किमती जारी केल्या जातात. या वेबसाइटद्वारे जारी केलेल्या दरावर, 3 टक्के जीएसटी स्वतंत्रपणे जोडणे आवश्यक आहे.
सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
- 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिले असते.
- 22 कॅरेटच्या सोन्यावर 916 लिहिले असते.
- 21 कॅरेट सोन्यावर 875 लिहिले असते.
- 18 कॅरेट सोन्यावर 750 लिहिले असते.
- 14 कॅरेटच्या सोनाच्या दागिन्यांवर 585 लिहिले असते.