Lokmat Money > बिझनेस न्यूज > आजपासून जागतिक उद्योजकता परिषद, मोदींच्या हस्ते उद्घाटन

आजपासून जागतिक उद्योजकता परिषद, मोदींच्या हस्ते उद्घाटन

येथे होणा-या तीन दिवसांच्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेचे (जीईएस) उद्घाटन मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:04 AM2017-11-28T01:04:53+5:302017-11-28T01:04:59+5:30

येथे होणा-या तीन दिवसांच्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेचे (जीईएस) उद्घाटन मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.

 From today, the inauguration of the Global Entrepreneurship Council, Modi | आजपासून जागतिक उद्योजकता परिषद, मोदींच्या हस्ते उद्घाटन

आजपासून जागतिक उद्योजकता परिषद, मोदींच्या हस्ते उद्घाटन

हैदराबाद : येथे होणा-या तीन दिवसांच्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेचे (जीईएस) उद्घाटन मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हांका ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ परिषदेला येत आहे.
३६ वर्षीय इव्हांका या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागारही आहेत. ट्रम्प प्रशासनातील अधिकारी आणि उद्योजकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्या करणार आहेत. अमेरिकेच्या ३८ राज्यांतील ३५० प्रतिनिधी या शिष्टमंडळात आहेत. भारत-अमेरिका यांच्यातर्फे होणाºया या परिषदेसाठी हैदराबादचे सुशोभीकरण केले आहे. शिखर परिषदेत ऊर्जा व पायाभूत सेवा, आरोग्य व जीवन विज्ञान, वित्तीय तंत्रज्ञान व डिजिटल अर्थव्यवस्था, माध्यम व मनोरंजन यांवर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान मोदी आणि इव्हांका ट्रम्प यांच्यासह पाहुण्यांसाठी फलकनुमा राजवाड्यात निजामकालीन टेबलावर स्नेहभोजन होणार आहे.

Web Title:  From today, the inauguration of the Global Entrepreneurship Council, Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.