Lokmat Money > बिझनेस न्यूज > आज अ‍ॅडव्हान्स टॅक्स जमा करण्याची अखेरची तारीख, विसरलात तर भरावा लागेल मोठा दंड

आज अ‍ॅडव्हान्स टॅक्स जमा करण्याची अखेरची तारीख, विसरलात तर भरावा लागेल मोठा दंड

तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 01:33 PM2023-09-15T13:33:25+5:302023-09-15T13:35:31+5:30

तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरू शकता.

Today is the last date to pay advance tax if you forget you will have to pay a huge penalty income tax department | आज अ‍ॅडव्हान्स टॅक्स जमा करण्याची अखेरची तारीख, विसरलात तर भरावा लागेल मोठा दंड

आज अ‍ॅडव्हान्स टॅक्स जमा करण्याची अखेरची तारीख, विसरलात तर भरावा लागेल मोठा दंड

Advance Tax Deadline: अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्याची आज शेवटची तारीख आहे. १५ सप्टेंबर २०२३ ही अ‍ॅडव्हान्स टॅक्स जमा करण्याची अखेरची तारीख आहे. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरू शकता. प्रत्येक तिमाहीच्या अखेरच्या महिन्याच्या १५ तारखेला किंवा त्यापूर्वी चार हप्त्यांमध्ये अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरावा लागतो.

अ‍ॅडव्हान्स टॅक्स हा असा टॅक्स आहे जो वर्षाच्या शेवटी न देता आर्थिक वर्षादरम्यान भरला जातो. हा कर केव्हा केव्हा भरायचा हे टॅक्स कायदे सांगतात. अ‍ॅडव्हान्स टॅक्स एका आर्थिक वर्षात हप्त्यांमध्ये भरला जातो. अ‍ॅडव्हान्स टॅक्सला पे अ‍ॅज यू अर्न असंही म्हणतात.

किती लागतो दंड
अ‍ॅडव्हान्स टॅक्स वेळेवर जमा न केल्यास, आयकर कायद्याच्या कलम २३ बी आणि २३४ सी अंतर्गत टॅक्सवर दंड आकारला जाऊ शकतो. जर करदात्यानं अ‍ॅडव्हान्स टॅक्सची संपूर्ण रक्कम जमा केली नाही किंवा भरलेला अ‍ॅडव्हान्स टॅक्स एकूण अ‍ॅडव्हान्स टॅक्सच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर कलम २३४बी अंतर्गत व्याज आकारलं जातं. भरलेल्या आगाऊ कराचा हप्ता निर्धारित टक्केवारीपेक्षा कमी असल्यास, कलम २३४ सी अंतर्गत एप्रिल ते कर भरण्याच्या तारखेपर्यंत दर महिन्याला १ टक्के किंवा महिन्याच्या काही हिस्स्यावर व्याज आकारले जाते.

Web Title: Today is the last date to pay advance tax if you forget you will have to pay a huge penalty income tax department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.