सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (IOC) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (HPCL)ने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केलेली नाही. मात्र, पेट्रोलच्या दरात 15 दिवसांत प्रतिलिटर 1.6 रुपयांनी वाढ झाली आहे आणि तीन महिन्यांत सुमारे 11 रुपये प्रतिलिटर एवढी पेट्रोलची किंमत वाढली आहे. मंगळवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 82.08 रुपये तर मुंबईत 88.73 रुपये प्रतिलिटर झाली. ऑगस्टमध्ये दिल्लीत डिझेलचे दर 73.56 रुपये आणि मुंबईत 80.11 रुपये होते. करामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे इंधनाचे दर वाढले आहेत.
दररोज सकाळी 6 वाजता किंमत बदलते
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये बदल होत असतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
म्हणूनच पेट्रोल डिझेलच्या किमतीत बदल होतो. आंतरराष्ट्रीय इंधन बाजारामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीतील बदल थेट स्थानिक बाजारात दिसून येतो. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती आणि परकीय चलन दरांनुसार दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात.
आज देशातील बड्या शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या नवीन किमती जाणून घ्या
(02 सप्टेंबरला पेट्रोल किंमत)
दिल्ली पेट्रोल 82.08 रुपये तर डिझेल 73.56 रुपये प्रतिलिटर आहे.
मुंबई पेट्रोलची किंमत 88.73 रुपये आणि डिझेलची किंमत 80.11 रुपये प्रतिलिटर आहे.
कोलकाता पेट्रोल 83.57 रुपये आणि डिझेल 77.06 रुपये प्रतिलिटर आहे.
चेन्नई पेट्रोलची किंमत 85.04 रुपये आणि डिझेलची किंमत 78.86 रुपये आहे.
नोएडा पेट्रोल 82.36 रुपये तर डिझेल 73.87 रुपये प्रतिलिटर आहे.
गुरुग्राम पेट्रोल 80.23 रुपये तर डिझेल 74.03 रुपये प्रतिलिटर आहे.
लखनऊ पेट्रोल 82.26 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 73.77 रुपये आहे.
पाटणा पेट्रोल 84. 64 रुपये तर डिझेल 78.72 रुपये प्रतिलिटर आहे.
जयपूर पेट्रोल 89.29 रुपये आणि डिझेल 82.62 रुपये प्रति लिटर आहे.
आपल्या शहरातील आजचे भाव जाणून घ्या
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील माहीत करत येतात.(दररोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासायची). इंडियन ऑइल ग्राहक आरएसपी लिहून 9224992249 वर मेसेज पाठवून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 वर आरएसपी लिहून मेसेज पाठवू शकतात. त्याच वेळी एचपीसीएल ग्राहकांना एचपी प्राइस लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.